देशात कोरोनाचे रूग्ण वाढतायत. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. अक्षय कुमार, विकी कौशल तसंच भूमी पेडणेकर या कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यामध्ये आता अजून एका अभिनेत्रीची भर पडली आहे. अभिनेत्री कतरिना कैफ देखील कोरोना पॉझिटीव्ह आली आहे.
ADVERTISEMENT
अभिनेत्री कतरिना कैफने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. कतरिना तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते, “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. मी स्वत:ला क्वारंटाईन केलं असून घरातच आयसोलेट राहणार आहे. मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्व प्रोटोकॉल पाळतेय. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करते की, त्यांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. सुरक्षित राहा आणि स्वत:ची काळजी घ्या.”
कतरिना सध्या ‘टायगर 3’ या सिनेमामध्ये व्यस्त होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता सलमान खान दिसणार आहे. तर आता कतरिनाला कोरोना झाल्यामुळे त्याचा शूटींगवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर लवकरच कतरिना अक्षय कुमारसोबत ‘सूर्यवंशी’ या सिनेमामध्ये दिसणार आहे.
ADVERTISEMENT