आर्थिक फसवणूक प्रकरणी किरण गोसावी अटकेत असून त्याची महिला साथीदार कुसुम गायकवाडला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी आज तिला न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ADVERTISEMENT
मलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून किरण गोसावी आणि त्याच्या महिला साथीदाराने पुण्यातील कसबा पेठ भागात राहणार्या चिन्मय देशमुख या तरुणाची आर्थिक फसवणूक केल्याची घटना 2018 मध्ये घडली होती. त्या प्रकरणी चिन्मय याने फरासखाना पोलिसाकडे तक्रार दिल्यानंतर त्याचा शोध सुरू होता.त्याच दरम्यान आर्यन खान ड्रग्स प्रकरणी पंच म्हणून किरण गोसावी राहिला आणि त्यावेळी आर्यन सोबतचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
किरण गोसावीचा तो फोटो चिन्मय देशमुख याने पाहताच,त्याने पोलिसांना तक्रारीची आठवण करुन दिली आणि किरण गोसावी तोच आरोपी असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा किरण गोसावीचा पोलीस शोध घेत असताना, त्याला कात्रज येथून अटक करण्यात आली. त्यानंतर किरण गोसावीला न्यायालयात हजर केल्यावर वेळोवेळी तपास कामानिमित्त पोलीस कोठडी मध्ये वाढ झाली.त्याच दरम्यान राज्यातील 9 ठिकाणी किरण गोसावी विरोधात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झाले.त्यातील सुरुवातीला फरासखाना प्रकरण सुरू होतेच, लष्कर आणि वानवडी प्रकरणी यापैकी कोणी तरी किरण गोसावी याचा ताबा घेणार हे निश्चित मानले जात असताना.लष्कर पोलिसानी त्याचा ताबा घेऊन लष्कर न्यायालयामध्ये हजर केल्यावर 8 दिवसांची पोलीस सुनावण्यात आली.
या सगळ्या प्रकरणांमध्ये त्याला साथ देणारी महिला कुसुम गायकवाड हिचा शोध सुरू असताना, तिला वाकड येथून अटक करण्यात आली.तिला आज न्यायालयात हजर केल्यावर पोलिसांनी दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली.मात्र न्यायालयाने तीन दिवसाची कोठडी सुनावली आहे.
किरण गोसावी पुणे पोलिसांना कसा गुंगारा देत होता?
किरण गोसावीविरोधात आणखी एक गुन्हा
पिंपरी-चिंचवडमधील भोसरी पोलिसांनी किरण गोसावीविरुद्ध फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला असून, लवकरच पिंपरी-चिंचवड पोलीस किरण गोसावीला येरवडा कारागृहातून ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी परिसरातील विजयकुमार सिद्धलिंग कानडे याने किरण गोसावी याच्या शिवा इंटरनॅशनल नावाच्या कंपनीशी ऑनलाइन संपर्क साधला होता. त्यावरून किरण गोसावी याने विदेशात विजयकुमारला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन देत ईमेल पाठवला होता. हे काम करण्यासाठी किरण गोसावीने 2 लाख 25 हजार रुपये विजयकुमारकडून त्याच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विजयकुमारने पैसे जमा केले होते. पैसे जमा करून 6 वर्षे झाली तरीही विजय कुमारला नोकरी मिळाली नाही आणि त्याबद्दल किरण गोसावीचं काही उत्तरही मिळालं नाही. त्यामुळे विजय कुमार यांनी आता किरण गोसावीविरुद्ध पिंपरी-चिंचवमधील भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT