भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात 19 बंगले आहेत असा आरोप केला. संजय राऊत यांनी हे आरोप खोडून काढले. त्यानंतर ते बंगले जर नसतील तर कुठे गेले? जर बंगले नव्हते तर मग टॅक्स कसा भरला? असे प्रश्न किरीट सोमय्यांनी उपस्थित केले आहेत. तसंच किरीट सोमय्यांनी आपण त्या ठिकाणी जाणार असलं म्हटलं होतं त्यानुसार किरीट सोमय्या हे कोर्लई गावात उपस्थित झाले. त्यावेळी भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले.
ADVERTISEMENT
उद्धवजी फक्त जनतेला सांगा, मुख्यमंत्री असूनही माझ्या पत्नीचे बंगले चोरीला गेले-किरीट सोमय्या
भाजपचे कार्यकर्ते कोर्लई ग्रामपंचायतीत गेले, मात्र शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊ शकले नाहीत त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते आमने सामने आले आहेत. दोन्ही बाजुंनी घोषणाबाजी सुरू आहे. ग्रामपंचायत परिसरात मोठ्याप्रमाणावर पोलीस दाखल आहेत.
किरीट सोमय्या येणार म्हणून पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी म्हणून गावात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावातील ग्रामपंचायतीस भेट दिली. तिथे ते जवळपास दहा ते पंधरा मिनिटं होतं. यानंतर ते कार्यालयातून बाहेर पडून आपल्या ताफ्यासह पुढे मार्गस्थ झाले, त्याचवेळी या ठिकाणी राडा सुरू झाला. राडा सुरू झाल्यानंतर किरीट सोमय्या हे पोलीस ठाण्यात गेले आहेत. आम्ही आमची कागदोपत्र घेऊन जी प्रक्रिया करत होतो त्यात अडथळे घालण्याचा प्रयत्न केला गेला याला काही अर्थ नाही असंही एका भाजप कार्यकर्त्याने म्हटलं आहे.
कोर्लईचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी काय म्हटलं आहे?
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांच्या नावे साडे नऊ एकर जमीन आहे. या जमिनीवर 19 बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सदरच्या जागेवर 19 बंगले नाहीत असे ठासून सांगितले. जर बंगले असतील तर राजकारण सोडू असे म्हटले होते. प्रत्यक्षात या जागेची स्थळपाहणी केली असता या जागेवर बंगले नाहीत. या जागेवर नारळाची झाडं, गुरांचा गोठा, पंप, शेड, विहीर ,पाण्याच्या टाक्या , साठवण तलाव असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारचा माफीनामा मागितला नसल्याचे कोर्लई सरपंच प्रशांत मिसाळ यांनी स्पष्ट केले.
ADVERTISEMENT