Kolhapur Flood: कोल्हापूरकरांची चिंता वाढवणारी बातमी, राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले!

मुंबई तक

• 02:09 PM • 25 Jul 2021

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर कोल्हापूरकरांची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. कोल्हापूरची प्रमुख नदी असलेल्या पंचगंगेची धोक्याची पातळी अद्यापही कमी झालेली नाही. अशातच आता कोल्हापूरमधील महत्त्वाचं समजलं जाणारं राधानगरी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरलं असून त्यातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. आधीच मुसळधार पावसामुळे कोल्हापूरच्या […]

Mumbaitak
follow google news

दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर

हे वाचलं का?

कोल्हापूरकरांची चिंता वाढवणारी बातमी आता समोर आली आहे. मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टीमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा फटका बसला आहे. कोल्हापूरची प्रमुख नदी असलेल्या पंचगंगेची धोक्याची पातळी अद्यापही कमी झालेली नाही. अशातच आता कोल्हापूरमधील महत्त्वाचं समजलं जाणारं राधानगरी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरलं असून त्यातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे.

आधीच मुसळधार पावसामुळे कोल्हापूरच्या शहरी भागात देखील पुराचं पाणी शिरलं आहे. रविवारी सकाळपासून पंचगंगेची पातळी हळहळू कमी होऊ लागली होती. मात्र, रविवारी दुपारी 3:55 वाजेच्या सुमारास राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने 3 व 6 क्रमांकाचा दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणाचे दरवाजे स्वयंचलित आहेत. सध्या या धरणातून एकूण 4256 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

राधानगरी डॅम चार वाजताच्या सुमारास 100 टक्के भरल्यानंतर त्यावरील स्वयंचलित दोन दरवाजे सुरु झाले आहेत. त्यामुळे या धरणातील पाणी थेट पंचगंगा नदीमध्ये येणार असून त्यामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी पुन्हा वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

राधानगरी धरण क्षेत्रात अद्यापही मुसळधार पाऊस सुरुच आहे. यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं गेलं आहे. यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. ज्यामुळे आता अतिरिक्त पाणी हे पंचगंगेच्या पात्रात सोडण्यात येत आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी ही 51 फुटांच्यावर आहे. अशात राधानगरी धरणाचं पाणी सोडल्याने नदीची पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, धरणातून सोडण्यात आलेलं पाणी पंचगंगेपर्यत पोहचण्यासाठी जवळपास 18 तासांचा कालावधी लागू शकतो. या दरम्यान, नदीचा पूर ओसरल्यास धरणातून सोडलेल्या पाण्याचा तीव्र परिणाम होणार नाही. गेल्या काही तासांपासून कोल्हापुरात पावसाने देखील विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुराचं पाणी हळूहळू ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, धरण क्षेत्रात पावसाचा वेग कायम राहिल्यास धरणातून अधिक विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी पुन्हा वाढू शकते. ज्याचा परिणाम पुन्हा एकदा कोल्हापूरकरांना भोगावा लागू शकतो

Kolhapur Flood: कोल्हापूरमधील ‘हे’ रस्ते आहेत बंद, प्रवास करण्याआधी ही यादी जरुर पाहा

दरम्यान, कोल्हापूर जिल्हयात NDRFच्या 6 तुकडया दाखल झाल्या असून बचाव कार्याचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. यावेळी भारतीय लष्कर दलाची 70 जवानांची एक तुकडी शिरोळ परिसरातील मदत कार्यासाठी दाखल झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 366 गावांना पुराचा फटका बसला असून यामध्ये आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते आहे. दुसरीकडे या पुरामुळे जिल्हयातील महावितरणची 10 उपकेंद्रे पूर्णत: बंद झाली आहेत.

    follow whatsapp