कोकणात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली आहे. महाडमधील तळीये गावात दरड कोसळून सुमारे ५२ जणांचा बळी गेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जवळपास संपूर्ण गावच दरडीखाली नष्ट झाल्याचं चित्र तयार झालंय. परंतू हे गाव पुन्हा वसवण्याची जबाबदारी आता MHADA ने घेतली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली.
ADVERTISEMENT
या घटनेत ज्यांची घरं जमिनदोस्त झाली, त्यांना पुन्हा पक्की घरं बांधून देणार असल्याचंही आव्हाडांनी जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुर्घटनाग्रस्त गावाला भेट देऊन झालेल्या नुकलानाची पाहणी केली. यावेळी सरकार तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, काळजी करु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा शब्द दिला. यानंतर आव्हाडांनी गाव पुन्हा वसवण्याची घोषणा केली आहे.
गाव नव्याने वसवण्याआधी नेमकी किती घरं होती, कोणत्या ठिकाणी मंदीर, मशिद, दवाखाना या गोष्टी होत्या याची माहिती घेतली जाणार आहे. शोधकार्य थांबल्यानंतर पावसाने उसंत घेतल्यानंतर म्हाडाच्या वतीने हे काम हाती घेण्यात येईल. यानंतर रुपरेषा आखून तळीये गाव पुन्हा वसवण्यात येईल असंही आव्हाड यांनी सांगितलं.
म्हाडाकडून नव्याने वसवण्यात येणारं गाव हे सोयी-सुविधांनी उपयुक्त असेल. तसेच या पक्क्या घरांना पुढच्या ३० वर्षांत काहीही होणार नाही असं आश्वासन आव्हाड यांनी दिलं.
ADVERTISEMENT