कोकणच्या दशावतारातला ‘लोकराजा’ काळाच्या पडद्याआड, सुधीर कलिंगण यांचं निधन

मुंबई तक

• 10:35 AM • 07 Feb 2022

कोकणच्या दशावतारातला लोकराजा अशी ख्याती असलेले सुधीर कलिंगण यांचं निधन जालं आहे. सुधीर कलिंगण 49 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना गोवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर कलिंगण यांच्या अकाली निधनामुळे लोककला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. कोकणची शान आणि दशावतारातील लोकराजा शिवराम ऊर्फ […]

Mumbaitak
follow google news

कोकणच्या दशावतारातला लोकराजा अशी ख्याती असलेले सुधीर कलिंगण यांचं निधन जालं आहे. सुधीर कलिंगण 49 वर्षांचे होते. त्यांची प्रकृती बिघडली त्यामुळे त्यांना गोवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर कलिंगण यांच्या अकाली निधनामुळे लोककला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

हे वाचलं का?

कोकणची शान आणि दशावतारातील लोकराजा शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण यांचं आज निधन झालं. पहाटे 3 वाजता त्यांनी गोव्यातील खाजगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सुधीर कलिंगण यांनी वयाच्या अवघ्या 49व्या वर्षी एक्झिट घेतल्याने दशावतार क्षेत्रातील कलाकार आणि रसिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कोकणातील दशावतारी परंपरा जीवंत ठेवण्याचं काम त्यांनी केलं होतं. कलिंगण म्हणजे दशावतारातील एक आगळवेगळ व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने दशावतार पोरके झाले आहे. सुधीर कलिंगण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. ते सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य होते. तसेच दशावतार चालक-मालक संघाचे सचिव होते.

सुधीर कलिंगण यांनी दशावतार लोककलेत राजा, स्त्री वेशातील भूमिका तसेच अनेक वेगवेगळ्या भूमिका सुद्धा त्यांनी दशावतार लोककलेत अजरामर केल्या. त्यामुळेच त्यांना रसिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेत ‘लोकराजा’ ही पदवी बहाल केली गेली. त्यांनी केलेल्या अनेक भूमिका रसिक प्रेक्षकांच्या कायमच आठवणीत राहतील अश्याच आहेत. वेळा चंदनासारखी त्यानी वठवलेली भूमिका प्रेक्षकांना अक्षरशः रडायला लावायची. त्यासोबतच त्यांनी अनेक वेगवेगळ्या भूमिका वटवून त्या भूमिकांना न्याय देण्याचं काम केलं. कोकणात कुठेही सुधीर कलिंगण यांचं नाटकाचा प्रयोग असला तरी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळायचा.

सुधीर कलिंगण यांनी दशावतार लोककलेत स्त्री भूमिकेला आपल्या लोककलेतून न्याय दिला. दशावतार लोककलेतील कुठलीही भूमिका वठवत असताना त्यासाठी केली जाणारी वेशभूषा आणि चेहऱ्यावरील मेकअप हे सर्व काही तो कलाकारच करत असतो. सुधीर कलिंगण यांनी स्त्री भूमिकेसाठी स्वतः साडी नेसून ती भूमिका वठवली त्यांना त्या वेशात पाहिल्यानंतर काही काळ संभ्रम व्हायचा एवढा हुबेहूब पेहराव ते करायचे. लोककलेत नाट्यप्रयोग सादर करत असताना स्पष्ट उच्चार, संस्कृत भाषेतील प्रभुत्व, प्रयोगावेळी संवादात केली जाणारी शब्दफेक आणि एकूणच पेहराव यामुळेच नाट्यरसिकांना कायमच त्यांच्या भूमिकांत आकर्षण असायचं. त्यांनी नाट्य प्रयोगात संस्कृत भाषेत संवाद करत नाट्य रसिकांना खिळवत ठेवलं होतं. अशा लोकराजाने अकाली एक्झिट घेतल्याने लोक हळहळले आहेत.

    follow whatsapp