Bhagat Singh Koshyari Exclusive Interview: देहरादून: आदित्य ठाकरे याच्यावर मी प्रेम करतो.. आजही मी त्याच्यावर माझ्या मुलाप्रमाणे प्रेम करतो. असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोश्यारी हे राज्यपाल असताना ठाकरे आणि त्यांच्यातून विस्तवही जात नव्हता. असं असातानाही राज्यपाल कोश्यारी यांनी असं म्हटलं आहे की, आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) त्यांचं मुलाप्रमाणे प्रेम होतं. मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भगतसिंह कोश्यारींनी आदित्य ठाकरेंवर आपलं प्रचंड प्रेम असल्याचं म्हटलं आहे. पण ते नेमकं असं का म्हणाले याविषयी जाणून घ्या सविस्तरपणे. (i love aditya thackeray like a child what is the exact story told by bhagat singh koshyari)
ADVERTISEMENT
पाहा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदित्य ठाकरेंबाबत काय म्हणाले:
‘आदित्यवर मी माझ्या मुलाप्रमाणे प्रेम करतो…’
‘तुम्हाला माहितेय की… आघाडीने सांगितलं की, आमचं बहुमत झालंय. तर मी त्यांना म्हटलं की, ठीक आहे.. पत्र घेऊन या… बिचारा तो.. आदित्य त्याच्यावर मी प्रेम करतो. आजही मी त्याच्यावर प्रेम करतो माझ्या मुलाप्रमाणे. तो बिचारा फोन करत राहिला.. पण दिल्लीहून कोणी आलंच नाही. मी तेव्हा पत्रच आलं नाही. बिचाऱ्याला नाराज होऊन बाहेर जावं लागलं. किती वाईट वाटलं असेल मला तेव्हा.. तो माझ्या मुलासारखा आहे. चांगलं वाटलं असेल का मला.. जेव्हा त्यांनी ठरवलं की, सत्ता बनवायची तेव्हा मी त्यांना विचारलं की, तुमचा नवरदेव कुठे आहे..’
‘हे काय उचित आहे का? की, ज्यांना मुख्यमंत्री व्हायचंय त्यांनी असं न येणं काही बरोबर आहे का? उद्या जर म्हणाले की, मी तयारच नाही तर? मोठ्या लोकांनी समजावलं.. मग त्यांच्या लक्षात आलं.’
Exclusive: ‘उद्धव ठाकरे संत माणूस, पण शकुनी मामाच्या..’, कोश्यारींचा पवारांवर वार?
‘प्रफुल पटेल यांच्याशी मी बोललो.. म्हटलं तुम्ही सीनियर आहात. ते म्हणाले की, हे चुकीचं आहे. त्यांनी (उद्धव ठाकरे) यायला हवं. ते म्हणाले की, आम्ही येणार नाही. मी म्हटलं.. किमान पत्र तरी लिहून आणा. मी स्वीकारतो. तुम्हाला माहिती आहे का.. तीन तास लागले ते पत्र देण्यासाठी. विचारा तुम्ही शरद पवार, भुजबळ यांना.’ असं कोश्यारी यावेळी म्हणाले.
‘शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसविण्याऐवजी स्वत: सेनापतीच बसले…’
‘पण हा कोणता प्रकार आहे.. मी त्यादिवशी बोलू शकत नव्हतो. मात्र, आज बोलतोय. तुम्ही सगळ्यांना विचारा. शेवटी.. पवारांनी सांगितलं तेव्हा माझ्याकडे पत्र आलं. जेव्हा मी म्हटलं की, ती व्यक्ती या पदासाठी नाही तर लोकांच्या मार्गदर्शनासाठी होती.’
‘तेव्हा म्हणत होते की, शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसविण्याचा बाळासाहेबांना वचन दिलेलं. तेव्हा शिवसैनिकाला बसविण्याऐवजी स्वत: सेनापतीच मुख्यमंत्रिपदी बसले. बाळासाहेबांचं स्वप्न तर संपलं..’
ठाकरेंचं पत्र कोश्यारींच्या जिव्हारी! सांगितलं 12 आमदारांच्या फाईलचं सत्य
‘माझं म्हणणं आहे की, जे आपल्याला बोलायचं आहे… माणूस कधी-कधी चुकीचं बोलून जातो. मी पण एका ठिकाणी चुकीचं बोललो होतो त्यावेळी मी लगेच माफी मागितली. मला कधीच वाईट वाटत नाही कारण मी एक माणूस आहे. मी 90 वेळा योग्य काम करत असेल तर 5 वेळा माझ्या हातून चूक कामही होत असेल. पण मला दु:ख वाटत नाही.’
‘पण माणसाला एखादी गोष्टच समजत नसेल.. त्याच दोष दुसऱ्यावरच टाकत असेल तर तसं अजिबात चालणार नाही.’ असं म्हणत कोश्यारींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT