ADVERTISEMENT
गुजरातमधील २४ वर्षीय क्षमा बिंदू दोन-तीन दिवसातच देशभरात पोहोचलीये.
क्षमा बिंदू एकल विवाह म्हणजेच स्वतःशीच विवाह करतेय.
क्षमा बिंदूचा विवाह रितीरिवाजाप्रमाणेच पार पडणार असून, ती हनिमूनलाही जाणार आहे.
क्षमा बिंदूचा विवाहावरून आता वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
वडोदरातील २४ वर्षीय क्षमा बिंदूच्या विवाहाबद्दल स्थानिक नेत्या सुनीता शुक्ला यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
क्षमा बिंदू एका मंदिरात सात फेरे घेणार आहे.
यालाच सुनीता शुक्ला यांनी विरोध केला आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या लग्नालाही त्यांनी विरोध केला आहे.
क्षमा बिंदू मंदिरात लग्न करणार असेल, तर आम्ही तिला असं करू देणार नाही. अशा पद्धतीचं लग्न हिंदू धर्मविरोधी आहे, असं सुनीता शुक्ला यांचं म्हणणं आहे.
क्षमा बिंदू मानसिकदृष्ट्या आजारी आहे, असं सुनीता शुक्लाचं मत आहे.
हिंदू संस्कृतीत मुलगा मुलीशी किंवा मुलगी मुलाशी विवाह करू शकते, असं म्हटलंय असं त्यांनी सांगितलं.
मी तिच्या मंदिरातील लग्नाच्या विरोधात आहे. तिला कुठल्याही मंदिरात लग्नाची परवानगी दिली जाणार नाही, असं भाजप नेता म्हणाली.
अशा पद्धतीचं लग्न म्हणजे हिंदू धर्माच्या विरोधात आहे. यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, असं सुनीता शुक्ला यांचं मत आहे.
२४ वर्षीय क्षमा बिंदू ११ जून रोजी लग्न करणार आहे.
क्षमा बिंदूने जोडीदार म्हणून स्वतःचीच निवड केलीये.
“मला कधीच लग्न करायचं नव्हतं, पण नवरी होण्याची इच्छा होती. त्यामुळेच मी स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेतला,” असं क्षमा म्हणाली.
भारतात यापूर्वी एखाद्या महिलेनं स्वतःशीच लग्न केलंय का? याबद्दल तिने इंटरनेटवर शोधलं.
तिला अशी एकही महिला सापडली नाही. क्षमा म्हणते, “देशात एकल लग्न करणारी कदाचित मी पहिलीच मुलगी असणार आहे.”
क्षमा एका खासगी कंपनीत नोकरी करते.
“स्वतःसोबत लग्न करणं लोकांना वेगळं वाटतं असेल. महिलांनाही स्वतःचे विचार असतात, हेच मी यातून लोकांना दाखवू इच्छिते,” असं क्षमा म्हणते.
क्षमा बिंदूचं लग्न गोत्री येथील एका मंदिरात होणार आहे.
त्याचबरोबर क्षमा हनिमूनलाही जाणार आहे. क्षमा हनिमूनसाठी गोव्याला जाणार असून, तिथे ती दोन आठवडे राहणार आहे.
ADVERTISEMENT