कोरोना पसरू लागला आहे, दुसऱ्या लाटेची भीषणता दिवसेंदिवस समोर येते आहे कुंभमेळा प्रतीकात्मक असला पाहिजे अशी विनंती करणारा फोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी अवधेशानंद गिरी यांना केला आहे. अवधेशानंद गिरी हे जुना आखाड्याचे महंत आहेत. अवधेशानंद यांना मी फोन केला होता आणि त्यांच्या प्रकृती चौकशी केली.
ADVERTISEMENT
कुंभमेळ्यात गर्दी झाली होती त्यामुळे अनेक साधू, संत आणि इतर लोकांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे मी आज स्वामी अवधेशानंद यांना फोन करून विनंती केली आहे की कुंभमेळा प्रतीकात्मक स्वरूपात असावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.
‘कोरोना पसरू लागला आहे, दुसऱ्या लाटेची भीषणता दिवसेंदिवस समोर येते आहे कुंभमेळा प्रतीकात्मक असला पाहिजे अशी सर्व साधू आणि महंताना नम्र विनंती’
पंतप्रधान नरेंद्र मोदी
कुंभमेळा ठरतोय नवा Corona Hotspot! हरिद्वारमध्ये 1701 केसेस पॉझिटिव्ह
हरिद्वारमध्ये कुंभमेळा भरला आहे या ठिकाणी लाखो साधूंची गर्दी झाली आहे. 10 ते 14 एप्रिल या काळात या ठिकाणी 1701 जणांना कोरोनाची बाधा झाली. तसंच आणखीही केसेस वाढत आहेत. कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो अशीही भीती व्यक्त होते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा प्रतीकात्मक पद्धतीने साजरा केला जावा असं म्हटलं आहे.
Kumbh Mela 2021 : महानिर्वाणी अखाड्याचे प्रमुख स्वामी कपिल देव यांचं कोरोनाने निधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. सर्व संत आणि महंत यांच्या प्रकृतीची माहिती मी घेतली आहे. दोन शाही स्नानांचा सोहळा पार पडला आहे आता कुंभमेळा प्रतीकात्मक पद्धतीने पार पाडावा अशी विनंती अवधेशानंद गिरी यांना केली आहे असं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटला अवधेशानंद यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनचा आम्ही सन्मान करतो. आयुष्य अनमोल आहे, जीव वाचवणं महत्त्वाचं आहे त्यामुळे मी तमाम जनतेला आग्रही विनंती करतो आहे की कोरोना परिस्थिती पाहता मोठ्या संख्येने स्नान करण्यास येऊ नये. त्याच बरोबर कोरोना प्रतिबंधाच्या सगळ्या नियमांचं पालन करावं असंही अवधेशानंद यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT