उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. उत्तर प्रदेशातील आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या घटनेनंतर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना पोलिसांनी हरगाव या ठिकाणी अटक केली आणि त्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. नजरकैदेत ज्या खोलीमध्ये ठेवलं आहे त्या खोलीत कचरा दिसताच प्रियंका गांधी यांनी ती खोली झाडून काढली.
ADVERTISEMENT
प्रियंका गांधी खोली झाडत असतानाचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत प्रियंका गांधी या खोली झाडूने स्वच्छ करताना दिसत आहेत. प्रियंका गांधी यांना पोलीस गेस्ट हाऊसमधल्या खोलीत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. ही खोली प्रियंका गांधी स्वच्छ करत असल्याचं या व्हीडिओत दिसून येतं आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
प्रियंका गांधी काय म्हणाल्या? रात्री काय घडलं?
माझ्या पेक्षाही या शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे असं प्रियंका पोलिसांना म्हणाल्या. तसंच त्यांची पोलिसांसोबत खडाजंगीही झाली. तुम्ही माझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे, तसंच मारहाण करण्याचाही प्रयत्न केला असा आरोप प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. मला धक्काबुक्की करण्यात आली, उत्तर प्रदेशात कायदा सुव्यस्था नाही, देशात कायदा आहे असंही त्यांनी सुनावलं. महिलांना पुढे करून मला त्रास देऊ नका असंही त्या म्हणाल्या. तसंच त्यांनी पोलिसांवर विविध आरोप केले ज्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं.
प्रियंका गांधी यांना ज्या खोलीत नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे त्या खोलीत कचरा दिसताच हातात झाडू घेऊन त्यांनी ती खोली झाडून काढली. त्यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. हा व्हीडिओ 7 हजारांहून जास्त लोकांनी लाईक केला आहे. तर अडीच हजारांपेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केला आहे. झाडू मारताना यांनी कॅमेरामन कुठून आणला असा प्रश्न काही नेटकरी विचारत आहेत. नवरात्र सुरू होतं आहे. इटलेश्वरी देवीची स्थापना करा असाही टोला काही नेटकऱ्यांनी लगावला आहे. काहीं नेटकऱ्यांनी या व्हीडिओत कौतुकही केलं आहे.
ADVERTISEMENT