लखीमपूर खीरी हिंसाचार : नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या; राहुल गांधींचा गंभीर आरोप

मुंबई तक

• 05:23 AM • 06 Oct 2021

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी आज लखीमपूर खीरीला भेट देणार आहेत. लखीमपूर खीरी परिसरात झालेल्या क्रूर […]

Mumbaitak
follow google news

लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचारानंतर आज काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारलं जात आहे. नियोजित हल्ला करून शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी आज लखीमपूर खीरीला भेट देणार आहेत.

हे वाचलं का?

लखीमपूर खीरी परिसरात झालेल्या क्रूर घटनेनंतर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ आज पीडितांच्या कुटुंबियांची घेणार होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने 144 कलम लागू असल्याचं सांगत भेटीची परवानगी नाकारली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपण दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूरीला जाणार असल्याचं स्पष्ट केलं. कलम 144 नुसार 5 लोक जाऊ शकत नाही, पण तीन लोकांना रोखता येत नाही’, असं त्यांनी स्पष्ट केलं.

लखीमपूर खीरी : व्हिडीओच समोर आलाय, आता तरी दोन अश्रू ढाळा -शिवसेना

‘शेतकऱ्यांवर सरकारकडून आक्रमण केलं जात आहे. जीपखाली चिरडून शेतकऱ्यांच्या हत्या केल्या जात आहे. भाजपच्या केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्याच्या मुलाबद्दल बोललं जात आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. आज पद्धतशीरपणे शेतकऱ्यांकडून त्यांचे हक्क हिरावून घेतले जात आहे. काल पंतप्रधान लखनऊमध्ये होते, पण ते लखीमपूर खीरीत गेले नाहीत’, अशी टीका राहुल गांधींनी केली.

Lakhimpur Kheri : राहुल गांधींना योगी सरकारनं भेटीची परवानगी नाकारली

‘पोस्टमॉर्डम व्यवस्थितपणे केलं जात नाहीये. शेतकऱ्यांची शक्ती सरकार दुर्लक्षित करत आहे. त्यांना चिथावणी देत आहे. ही वाईट गोष्ट आहे. आम्ही सरकारला पत्र दिलं आहे. आम्ही तीन लोक आज जाणार आहोत. उत्तर प्रदेशात आता शेतकऱ्यांना मारलं गेलं. यापूर्वी हाथरसमध्ये घडलं. त्यांच्या आमदारानेही बलात्कार केला होता. हे नव्या पद्धतीचं राजकारण उत्तर प्रदेशात सुरू आहे. गुन्हेगार जे हवं ते करु शकतात. मग बलात्कार असो की शेतकऱ्यांच्या हत्या. हत्या आणि बलात्कार करणारे तुरुंगाबाहेर असतात आणि पीडितांना तुरुंगात टाकलं जातं’, असं टीकास्त्र राहुल गांधी यांनी योगी सरकारवर डागलं.

    follow whatsapp