नागपूर : लॉकडाउन काळात फिरतं लंगर भागवतंय गरिबांची भूक

मुंबई तक

• 09:40 AM • 07 May 2021

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात बाजारपेठा बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यक्तींसाठी मोठा कठीण काळ तयार झाला आहे. अनेक गरीब आणि गरजू व्यक्तींना या काळात दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करावी लागत आहे. नागपुरात अशा गरजू लोकांसाठी जमशेद कपूर यांचं फिरत लंगर धावून आलं आहे. २०१३ […]

Mumbaitak
follow google news

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउनची घोषणा केली आहे. या काळात बाजारपेठा बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या व्यक्तींसाठी मोठा कठीण काळ तयार झाला आहे. अनेक गरीब आणि गरजू व्यक्तींना या काळात दोन वेळच्या जेवणासाठी वणवण करावी लागत आहे. नागपुरात अशा गरजू लोकांसाठी जमशेद कपूर यांचं फिरत लंगर धावून आलं आहे.

हे वाचलं का?

२०१३ पासून जमशेद कपूर यांनी लंगरसेवेला सुरुवात केली. आपल्या घरात जेवण तयार करत ते एका मोठ्या पातेल्यात भरुन जमशेद कपूर दुचाकीवरुन शहराच्या विविध भागांमध्ये फिरतात. रस्त्यातील गरीब आणि गरजू व्यक्तींना जमशेद जेवण देऊन अन्नदानाचं काम करतात. लॉकडाउन काळात रिक्षावाले आणि हातावर पोट असलेली अनेक लोकं रोजीरोटीसाठी बाहेर पडत असतात. अशावेळी आपल्या लंगर सेवेच्या माध्यमातून जमशेद कपूर या लोकांना हक्काच्या जेवणाची सोय करत आहेत. जमशेद कपूर दररोज वेगवेगळ्या डाळींची खिचडी तयार करुन गरीब व्यक्तींना अन्नदान करतात.

नागपूरमध्ये लॉकडाउन काळात जमशेद कपूर दररोज ४०० जणांना जेवण देत आहेत. जमशेद कपूर यांच्या फिरत्या लंगर सेवेचा नागपुरातील अनेक गरजू व्यक्तींना फायदा मिळतो आहे. एकीकडे लॉकडाउन काळात माणूसकीवरुन विश्वास उडेल अशा अनेक बातम्या आपण दररोज पाहतो. परंतू जमशेक कपूर यांच्यासारख्या व्यक्तींमुळे आजही माणूसकी जिवंत असल्याचा प्रत्यय येतो.

    follow whatsapp