वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून चांगलंच राजकारण राज्यात रंगलं आहे. महाविकास आघाडीतले नेते विरूद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना रंगतो आहे. फॉक्सकॉनचा हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यानंतर वेदांताचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सेमीकंडक्टरची किमया काय होऊ शकते हे सांगितलं आहे. CNBC TV18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
ADVERTISEMENT
अनिल अग्रवाल यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
गुजरातमध्ये गेलेला प्रकल्प १.५४ लाख कोटी रूपयांचा आहे. या प्रकल्पामुळे एक लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. वेदांता फॉक्सकॉन कंपनीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मेड इन इंडिया सेमीकंडक्टर निर्मितीमुळे किंमतीत मोठी घसरण होऊ शकते असंही सांगितलं आहे. तसंच या प्रकल्पासाठी त्यांनी भारताचे आभार व्यक्त केले आहेत.
भारतात तयार होणाऱ्या सेमीकंडक्टर चीपमुळे लॅपटॉपच्या किंमतीत मोठी घट होणार आहे. या सेमीकंडक्टरमुळे एक लाख रूपयांचा लॅपटॉप ४० हजारांपर्यंत किंवा त्यापेक्षाही कमी किंमतीत मिळू शकतो. सेमीकंडक्टर प्रोजेक्ट सध्या तैवान आणि कोरियात आहे. लवकरच हा प्रोजेक्ट भारतात सुरू होईल असंही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्येच होणार, मोदींच्या फोननंतर उदय सामंतांची माहिती
आगामी काळात महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करणार असंही मी अनिल अग्रवाल यांनी म्हटलंय
आगामी काळात महाराष्ट्रातही आम्ही प्रकल्प सुरू करणार आहोत. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक कार्स यांची निर्मिती महाराष्ट्रात करणार असल्याचंही अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प गुजरातला नेण्यासंबंधीचा करार वेदांता-फॉक्सकॉन ग्रुप आणि गुजरात सरकार यांच्यात करार झाला आहे. हा प्रकल्प १.५४ लाख कोटी रूपयांचा आहे. त्यामुळे तब्बल एक लाख जणांना नोकरी मिळणार आहे.
पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प गुजरातमध्ये कसा गेला? ‘खऱ्या’ मुख्यमंत्र्यांनी सांगावं- आदित्य ठाकरे
महाराष्ट्रात प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकारण रंगलं आहे. माजी मंत्री सुभाष देसाई यांनी अनिल अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीची इनसाईड स्टोरीही आज सांगितली.
काय आहे दावोसची इनसाईड स्टोरी?
सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे की, वेदांताचे अनिल अग्रवाल यांना आम्ही मे महिन्यात दावोसमध्ये भेटलो. त्यानंतर २४ जूनला दिल्लीला जाऊन फॉक्सकॉनचे अध्यक्ष यंग लिव्ह आणि त्यांचे सहकारी विन्सेंट ली यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर आम्ही त्यांना निमंत्रण दिलं की आपलं समाधान झालं आहे त्यामुळे तुम्ही मुंबईत येऊन MoU करावा हे सांगितलं. २४ जूननंतर आमचं सरकारच राहिलं नाही. त्यामुळे अॅक्टिव्हली काही करावं अशी परिस्थिती नव्हती. ज्या तारखा सांगितल्या त्यातला २६ जुलै हा दिवस महत्त्वाचा आहे.
२६ जुलैला फॉक्सकॉनचं एक मोठं शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलं. त्या सविस्तर चर्चेनंतर एक चांगलं प्रसिद्धीपत्रक सरकारने अधिकृपणे प्रसारित केलं. त्याच्या सगळ्या बातम्याही माध्यमांनी दिल्या. १ लाख ६९ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येते आहे, तळेगाव आणि नागपूरमध्ये बुटी बोरी येथे हा प्रकल्प होणार आणि १ लाख रोगजार निर्मिती होईल असे ढोल बडवण्यात आले. त्यावेळी महाविकास आघाडीची काय उणीव झाली? प्रयत्न कुठे कमी पडले याचा कुठेही उल्लेख केला नाही. या प्रकल्पाला केंद्र सरकारचं सहकार्य मिळतं आहे असंही सांगितलं गेलं. आता जे बोललं जातं आहे ते कातडी बचाव धोरण आहे असंही सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे.
एकीकडे या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलेलं असताना वेदांता आणि फॉक्सकॉनचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी लॅपटॉपच्या किंमती कशा कमी होतील हे सांगितलं आहे.
ADVERTISEMENT