नुकतीच दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराची घोषणा झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांचं नुकतंच २ महिन्यांपूर्वी निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मंगेशकर कुटुंबिय दिनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्काराच्या घोषणेप्रसंगी पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.. या पुरस्कारांची घोषणा करताना मंगेशकर कुटुंबियांनी यावर्षीपासून लता दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराचीही घोषणा केली.. महत्वाचं म्हणजे. या विशेष पुरस्काराचे पहिले मानकरी ठरलेत.. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. २४ एप्रिलला मुंबईतील षण्मुखानंद हॉलमधील भव्य कार्यक्रमात उषा मंगेशकर यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार प्रदान होणार आहे.. हा पुरस्कार स्वीकारणार असल्याची ग्वाही नरेंद्र मोदींनी मंगेशकर कुटुंबियांना दिली आहे.
ADVERTISEMENT
मात्र या सर्व पार्श्वभूमीवर लता दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्काराविषयी आणि प्रथम मानकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी या नावावरून चर्चेला सुरवात झाली आहे..हा पुरस्कार लता दिनानाथ मंगेशकर या नावाच्या, त्यांच्या कर्तृत्वाच्या तोलामोलाचा असला पाहिजे असं मंगेशकर कुटुंबियांनी स्पष्ट केलं आहे. ज्याच्यांबद्दल लता मंगेशकरांना एक विशेष आदर आणि मान होता अशी ऋषीतुल्य व्यक्ती या पुरस्काराला पात्र ठरणार आहे.
मात्र हा पुरस्कार जाहीर होताना.. लता मंगेशकर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खास स्नेहाची आठवण सतत होत आहे.लतादिदी आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अगदी खास स्नेह होता.बाळासाहेबांना त्या आपल्या मोठा भाऊ मानत असत. बाळासाहेबदेखील लतादिदींच्या प्रत्येक अडी अडचणीत त्यांच्या पाठीशी मोठ्या भावासारखे ठामपणे उभे राहत असत. बाळासाहेबांनी नेहमीच लतादिंदीचा खूप आदर केला. ते त्यांना देशाचा तसेच मराठी समाजाचा अभिमान मानत. बाळासाहेबांच्या निधनानंतरही मी आज मोठा भाऊ गमावला अशी प्रतिक्रिया लतादिंदीनी दिली होती. बाळासाहेबच नाही तर संपूर्ण ठाकरे कुटुंबियांशी लता मंगेशकरांचं जिव्हाळ्याचे संबंध होते.
त्यामुळे काल हा लता दिनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार नरेंद्र मोदींना जाहीर झाल्यावर.. सोशल मिडीयावर बाळासाहेब ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्या बहिण भावाच्या नात्याविषयी,स्नेहाविषयी पुन्हा एकदा चर्चेला सुरवात झाली आहे.
ADVERTISEMENT