सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चाहते भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.हा व्हिडिओ २८ वर्षांपूर्वींचा सुपरहिट ठरलेल्या हम आपके है कौनच्या शूटींगदरम्यानचा आहे. माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट बराच हिट ठरला होता. सुरज बडजात्या यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या व्यक्तिरिक्त रेणुका शहाणे, मोहनीश बहल, रीमा लागू, आलोक नाथ,अनुपम खेर आणि मराठमोळा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.
ADVERTISEMENT
माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा २८ वर्षांपूर्वीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये माधुरी दीक्षित, लक्ष्मीकांत बेर्डे आणि या सिनेमात हिट ठरलेला टफी डॉग पुढचा प्रसंग चित्रित करण्यासाठी सज्ज होत असल्याचा हा व्हिडिओ आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाहून सोशल मिडियावर चाहते भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय
माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा व्हिडीओ माधुरीच्या एका फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडताना दिसत आहे. एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, ‘बॉलिवूडचे सोनेरी दिवस’ दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, ‘आजकालची पिढी कधीच समजू शकणार नाही की लक्ष्मीकांत बेर्डे किती उत्तम अभिनेता होते. भारतीय चित्रपटांतील सर्वात विनोदी कलाकारांपैकी एक अश्या प्रकारच्या कमेंट या व्हिडिओवर पडताना दिसून येत आहेत.
ADVERTISEMENT