Mumbai vaccination fraud वर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई तक

• 10:57 AM • 19 Jun 2021

मुंबईत झालेल्या लसीकरण घोटाळ्याबाबत आता मुंबई उपनगरांचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मुंबईतल्या एका सोसायटीत लसीकरण घोटाळा झाला आहे हे तिथल्या 390 रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर समोर आलं होतं. आता याप्रकरणी पोलीस योग्य प्रकारे तपास करत आहेत आणि पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. लसीकरण घोटाळ्याचं पहिलं प्रकरण मुंबईतल्या […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत झालेल्या लसीकरण घोटाळ्याबाबत आता मुंबई उपनगरांचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. मुंबईतल्या एका सोसायटीत लसीकरण घोटाळा झाला आहे हे तिथल्या 390 रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर समोर आलं होतं. आता याप्रकरणी पोलीस योग्य प्रकारे तपास करत आहेत आणि पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

लसीकरण घोटाळ्याचं पहिलं प्रकरण मुंबईतल्या हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत घडलं. ही सोसायटी कांदिवली याठिकाणी आहे. सोसायटीच्या आवारातच लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. राजेश पांडे नावाचा एक जण यासाठी सोसायटीत आला होता त्याने आपण कोकिलाबेन अंबानी रूग्णालयाचे आहोत असं सोसायटीच्या कमिटी मेंबर्सना सांगितलं. संजय गुप्ता यांनी हे लसीकरण शिबीर घेतल आणि महेंद्र सिंग यांनी सोसायटीतल्या सदस्यांकडून लसींचे पैसे घेतले अशी माहिती आरोप करणाऱ्यांनी दिली आहे.

या इमारतीत राहणारे हितेश पटेल यांनी असं म्हटलं आहे की एका डोससाठी आमच्याकडून 1260 रूपये घेण्यात आले. माझ्या मुलाने याच ठिकाणी झालेल्या लसीकरण शिबीरात लस घेतली. मात्र आम्हाला लस घेतल्यानंतर कोणताही मेसेज आला नाही. तसंच आम्हाला लस घेतल्यानंतर कोणतेही फोटो किंवा सेल्फीही काढू दिले गेले नाहीत. 1260 रूपये एका डोससाठी या प्रमाणे सोसायटीतल्या 390 जणांनी लसीकरण शिबीर आयोजित करणाऱ्याला पाच लाख रूपये दिले.

आम्ही ज्या ज्या सदस्यांनी लस घेतली त्यापैकी एकालाही कोणतेही साईड इफेक्ट म्हणजे ताप येणं, अंग दुखणं असं काहीही झालं नाही. एवढंच काय आम्हाला लस घेतल्यानंतर कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्रही दिलं गेलं नाही. त्यामुळे आम्ही हा नेमका काय प्रकार घडला आहे याचा शोध घेण्यास सुरूवात केली. साधारण 15 दिवस गेल्यानंतर आम्हाला प्रमाणपत्रं देण्यात आली. मात्र असं कोणतंही शिबीर रूग्णालयातर्फे आयोजित करण्यात आलं नव्हतं असं रूग्णालयाने स्पष्ट केल्याने आम्हाला बनावट लस दिले गेले असा आरोप आता रहिवाशांनी केला.

दुसरं प्रकरण बोरीवली येथील आदित्य कॉलेजमध्ये घडलं या ठिकाणीही बोगस लस दिली गेल्याचा आरोप काही जणांनी केला आहे. हे प्रकरण 3 जूनला घडलं आहे. आम्ही या प्रकरणी पोलिसांना लक्ष घालायला सांगितलं आहे. मुंबई महापालिकेनेही या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणी अहवाल येईल आणि पोलीसही त्यांचं काम करत आहेत. या सगळ्या प्रकरणांची चौकशी आम्ही करतो आहे. एवढंच नाही तर यापुढे असे प्रकार घडू नयेत म्हणून मुंबईतल्या सोसायटीजने काळजी घ्यायला हवी. लसीकरणासाठी आलेल्या लोकांची नीट चौकशी केली पाहिजे असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp