गोवा निवडणुकीसाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांचा पत्ता कट

मुंबई तक

• 09:02 AM • 20 Jan 2022

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पणजीमधून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उत्पल पर्रिकरांना भाजपने दोन जागांचा पर्याय दिला आहे त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असलेल्या उत्पल यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. मात्र ती त्यांना देण्यात आलेली नाही. […]

Mumbaitak
follow google news

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पणजीमधून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. उत्पल पर्रिकरांना भाजपने दोन जागांचा पर्याय दिला आहे त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असलेल्या उत्पल यांनी पणजीतून उमेदवारी मागितली होती. मात्र ती त्यांना देण्यात आलेली नाही. पणजीतून बाबूश यांना तिकीट देण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

पणजी मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार बाबुश यांनाच तिकीट देण्यात आलं आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना आम्ही भाजपकडून तिकीट देण्याची तयारी दर्शवली आहे. आम्ही इतर दोन जागांचे पर्याय त्यांना दिले आहेत. त्यापैकी एक पर्याय त्यांनी नाकारला आहे, बहुदा ते दुसरा पर्याय स्वीकारतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्हाला मनोहर पर्रिकर आणि त्यांच्या कुटुंबाविषयी नितांत आदर आहे. उत्पल पर्रिकर असो किंवा मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असो ते सगळेजण आमच्या कुटुंबाचा भाग आहेत. पर्रिकर परिवार हा भाजप परिरवाराचाच भाग आहेत. त्यामुळे ते सगळे आमच्या जवळचेच आहेत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘कुणी मला खुर्ची देता का खुर्ची?’ ही देवेंद्र फडणवीसांची सध्याची अवस्था-संजय राऊत

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

‘गेल्या 10 वर्षांमध्ये गोव्यात भाजपनं स्थिर सरकार आणि विकासाचा मूलमंत्र प्रत्यक्षात उतरवला आहे. गोव्याच्या राजकारणात जी अस्थिरता होती, ती भाजपनं संपवली होती. तसेच, भाजपनं गोव्याला विकासाच्या नव्या मार्गावर आणलं.पुन्हा एकदा लूट करण्यासाठीच काँग्रेसला गोव्यात पुन्हा सत्ता प्रस्थापित करायची आहे. काँग्रेसमधून अनेक मोठ्या नेत्यांनी अलविदा केलं आहे. आता तिथे टीएमसीही आली आहे. मनोहर पर्रीकर यांच्यापासून ते विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यापर्यंत भाजपनं गोव्यात आतापर्यंत जनतेमध्ये चांगली प्रतिमा निर्माण केली आहे.’

‘एकीकडे जिथे भाजप गोव्याच्या विकासासाठी संघर्ष करतेय. तिथे दुसरीकडे इतर पक्ष केवळ भाजपसोबत संघर्ष करत आहे. टीएमसी गोव्यामध्ये यंदा निवडणूक लढवणार आहे. त्यांना सूटकेसच्या माध्यमातून पक्ष वाढवायचा आहे. टीएमसीची भूमिका हिंदूविरोधी आणि राष्ट्रवादविरोधी आहे’ असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp