महाराष्ट्रात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम

मुंबई तक

• 07:17 AM • 29 Jan 2021

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन आता 28 फेब्रुवारी पर्यंत कायम करण्यात आला आहे. मिशन बिगिन अंतर्गत अनेक गोष्टींना संमती देण्यात आली असली तरीही ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा ठिकाणी म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउन हा 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंदर्भातले एक पत्रक काढून ठाकरे सरकारने हा निर्णय कळवला आहे. राज्यातील कन्टेन्मेंट […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेला लॉकडाऊन आता 28 फेब्रुवारी पर्यंत कायम करण्यात आला आहे. मिशन बिगिन अंतर्गत अनेक गोष्टींना संमती देण्यात आली असली तरीही ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे अशा ठिकाणी म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाउन हा 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे. यासंदर्भातले एक पत्रक काढून ठाकरे सरकारने हा निर्णय कळवला आहे. राज्यातील कन्टेन्मेंट झोन अर्थात कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांमध्येच हा लॉकडाउन असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात गेल्यावर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन लागू करण्यात आला. त्यानंतर कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हे टप्प्याटप्याने शिथील करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनलॉकला मिशन बिगिन अगेन असं नाव दिलं. त्याअंतर्गत, थिएटर्स, जिम, हॉटेल, रेस्तराँ, बस-सेवा अटी शर्थींसह सुरु कऱण्यात आली. सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णयही काही दिवसांमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असलेला लॉकडाऊन हा 28 फेब्रुवारीपर्यंत कायम करण्यात आला आहे.

मागील वर्षी दिवाळीतल्या पाडव्यापासून राज्यातली मंदिरंही सुरु करण्यात आली आहेत. तसंच काही दिवसांपूर्वीच केंद्राने थिएटर्स, नाट्यगृहं, स्विमिंग पूल, जिम हे जास्त क्षमतेने सुरु करता येऊ शकतात यासंदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यावर अद्याप ठाकरे सरकारने निर्णय घेतलेला नाही. मात्र राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असलेला लॉकडाऊन हा आता 28 फेब्रुवारीपर्यंत कायम करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या वर्षात लॉकडाऊन संपेल असं वाटलं होतं. मात्र आधी 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम करण्यात आला होता आता आणखी एक महिना म्हणजेच फेब्रुवारी महिन्यातही कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील लॉकडाऊन कायम करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात मागील मार्च महिन्यात लॉकडाऊन लागू केला होता. आधी केंद्र सरकारने आणि त्यानंतर राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केला. हळूहळू अनलॉकच्या दिशेने आपण पावलं टाकत आहोत. मात्र ज्या ठिकाणी अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत कायम करण्यात आला आहे.

नागरिकांना कोणत्या सूचनांचं पालन करायचं आहे?

1) सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक

2) सामाजिक अंतर अर्थात सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक

3) हात धुणे आणि सॅनेटायझरचा वापर करणे आवश्यक

    follow whatsapp