महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? अजित पवारांचं साताऱ्यात सूचक वक्तव्य

मुंबई तक

• 08:27 AM • 03 Jan 2022

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य साताऱ्यामध्ये केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. रविवारी राज्यात 11 हजार रूग्णांची नोंद झाली. ही बाब नक्कीच चांगली नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. काय म्हणाले अजित पवार? ‘राज्यात कोरोना रूग्णांची […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार का? याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य साताऱ्यामध्ये केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. रविवारी राज्यात 11 हजार रूग्णांची नोंद झाली. ही बाब नक्कीच चांगली नाही. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागू शकतो असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

हे वाचलं का?

काय म्हणाले अजित पवार?

‘राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढायला लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कोरोना रूग्णांची संख्या वाढायला लागल्यानंतर निर्बंध आणले गेले आहेत. त्यामुळे अशी वेळ आपल्याकडेही येऊ शकते’ असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

ओमिक्रॉन बाधितांची संख्या फेब्रुवारीत पोहोचणार उच्चांकांवर; आयआयटीतील प्राध्यापकाचा दावा

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचंही संकट वाढलं आहे. तसंच कोरोना रूग्णही वाढले आहेत. त्यामुळेच काळजी घेण्याचं आवाहन वारंवार केलं जातं आहे. एवढंच नाही तर मास्क लावा, कोव्हिड संसर्ग होऊ नये असं वर्तन या सगळ्या गोष्टींचंही आवाहन केलं जातं आहे. अधिवेशन झाल्यानंतर अनेक मंत्री आणि विरोधी पक्षातले नेते यांना कोरोनाची बाधा झाली. तसंच सत्ताधारी पक्षातील आमदारांनाही कोरोना झाला. कोरोना रूग्णांच्या संख्येत रोज भर पडते आहे अशात वारंवार काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही काही दिवसांपूर्वी राज्यात सध्या तरी लॉकडाऊन लागणार नाही म्हटलं होतं. पण या सगळ्या वाढत्या रूग्णांकडे दुर्लक्ष करू नका असंही आवाहन केलं होतं. आता आज अजित पवार यांनी साताऱ्यात जे वक्तव्य केलं आहे त्यावरून त्यांनी लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.

आम्हाला राज्यात भाजपचा मुख्यमंत्री हवा आहे, ‘लगान’ची टीम नको-नारायण राणे

आणखी काय म्हणाले अजित पवार?

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत राणेंचा विजय झाला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.निवडणुकीत यश अपयश येतच असत.या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅक फुटवर जावं लागलं. सातारा,सांगली,पुणे या ठिकाणी चांगलं यश मिळालं. नारायण राणेंनी पुढे काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे.महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल असा विश्वास सुद्धा यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.या वेळी बोलताना अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सूनवत हे महाविकास आघाडीचे सरकार पडेल अशी चर्चा करतात त्यांना उत्तर दिले आहे.नारायण राणेंनी मागे असेच 1999 ते 2004 च सरकार पडण्याचा बराच प्रयत्न केला आणि आता नाराण राणेंच्या रुपाने एक नविन व्यक्तीची भर आता सरकार पाडण्यासाठी पडली असल्याची टिका अजित पवार यांनी केलीये

    follow whatsapp