सांगली: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याने सरकारला संचारबंदी आणि लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागला आहे. पण आता याच लॉकडाऊनचा फटका अनेकांना बसताना दिसतो आहे. मिरजमधील येथील एका गरीब कुटुंबातील पती-पत्नीने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
खॉंजा बस्ती येथे राहणारे सलीम गौससाहेब भटकळ (वय 47 वर्ष) आणि त्यांची पत्नी मर्यम बशीर नदाफ (वय 40 वर्ष) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सलीम हा रेल्वे स्टेशन परिसरात पानपट्टीत काम करत होता. तसेच याव्यतिरिक्त तो मिळेल ते काम देखील करत होता. सध्या लॉकडाऊन आणि संचारबंदी यामुळे व्यवसाय पूर्ण बंद असल्यामुळे तो आर्थिक विवंचनेत होता. तसेच त्याची पत्नी काही दिवसापासून आजारी होती. याचवेळी बचत गटातून घेण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी देखील त्याच्या मागे तगादा सुरु होता.
Lockdown आणि कोरोनाला कंटाळून केशकर्तनालय दुकानदाराची आत्महत्या
या सगळ्यात घराचा खर्च चालविणे कठीण झाल्यामुळे सलीम मागील काही दिवसांपासून निराश झाला होता. त्यातच काल (मंगळवार) त्याचा बचत गटाचा हप्ता भरण्याचा दिवस होता. त्यामुळे तो बराच आर्थिक विवंचनेत होता. अखेर याच विवंचनेतून काल दोघा पती-पत्नीने घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रथमदर्शनी त्याच्या पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे दिसून येत होते. पत्नीच्या आत्महत्येनतंर सलीमने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत होते.
कोरोनामुळे नवऱ्याचा मृत्यू, बातमी समजताच पत्नीची चिमुकल्यासह आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी घटना
सदरचे कुटुंब हे अत्यंत गरीब होते. त्यामुळेच लॉकडाऊन आणि संचारबंदीचा फटका हा या कुटुंबाला बसला आहे. आर्थिक चणचणीतून मार्ग न निघाल्यामुळे अखेर दोघा पती-पत्नीने आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. या सगळ्या प्रकारामुळे परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
बचत गटाचा हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने तसेच अर्थिक विवंचनेतून दोघांनी आत्महत्या केली असल्याचे परिसरातील नागरिकांचं म्हणणं आहे. यावेळी महात्मा गांधी चौक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरजच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.
ADVERTISEMENT