महाराष्ट्रात 15 मे पर्यंत वाढला Lockdown, ठाकरे सरकारचे आदेश

मुंबई तक

• 01:39 PM • 29 Apr 2021

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याआधी 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. आता तो 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भातलं एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये त्यामुळे लॉकडाऊन किमान दोन आठवड्यांनी वाढवण्यात […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. याआधी 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. आता तो 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाकरे सरकारने यासंदर्भातलं एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे. महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या कमी होताना दिसत नाहीये त्यामुळे लॉकडाऊन किमान दोन आठवड्यांनी वाढवण्यात येईल असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारीच दिले होते. आता त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

मुंबईत Corona ची दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली आहे का? डॉ. शशांक जोशी म्हणतात..

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात येताना दिसत नाहीये. त्यामुळे Lockdown चं नेमकं काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. त्याचं उत्तर आता मिळालं आहे. ठाकरे सरकारने 1 मे च्या सकाळी सात पर्यंत असलेले निर्बंध आता 15 मे पर्यंत वाढवले आहेत. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लॉकडाऊन लागल्यापासून म्हणजेच 14 एप्रिल ते 27 एप्रिल या कालावधीमध्ये महाराष्ट्रात 8 लाख 90 हजार 900 रूग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 8 लाख 3 हजार 451 रूग्ण याच कालावधीत कोरोनातून बरे झाले आहेत. असं असलं तरीही महाराष्ट्रातील रूग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊनच्या चौद दिवसांमध्ये 26 एप्रिल आणि 23 एप्रिल या दोन दिवसांचा अपवाद सोडला तर बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या ही पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येपेक्षा कमीच आहे.

Lockdown: दोन तासात लग्न आटपा नाहीतर 50 हजारांचा दंड, 22 तारखेपासून नवे निर्बंध

आता काय निर्बंध काय आहेत?

राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाची संबंधित कार्यालयं फक्त 15 टक्के कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील, कोरोनाशी संबधित अत्यावशक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आलं आहे

13 एप्रिलला जाहीर करण्यात आलेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना 15 टक्के कर्मचारी किंवा 5 कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल त्या क्षमतेने कार्यरत राहण्यास संमती

लग्नसमारंभ 2 ताासांमधेच उरकावा लागणार अन्यथा 50 हजारांचा दंड , उल्लंघन करणाऱ्या हॉलवर परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी

बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांन फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. हे नियम आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत वाहनांना लागू नसून प्रवासी राहात असलेल्या शहरांनाच लागू असतील.

आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणाऱ्यांवर 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.

किराणा, भाजीपाला दुकानं, फळविक्री, डेअरी हे सगळं सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहणार

    follow whatsapp