Marathi News Live Update : पुणे लोकसभेचे भाजपा-महायुती अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांची ही पहिलीच भेट होती.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:59 PM • 25 Mar 2024'मातोश्री'वर ठाकरे-पवारांमध्ये बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पोहोचले आहे. ठाकरेंचे खासदार संजय राऊतही मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या तिन्ही नेत्यांमध्ये जागावाटपांवर चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.
- 03:16 PM • 25 Mar 2024मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आनंदमठात धुळवड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील आनंदमठात धर्मवीर आनंद दिघे यांच्या फोटोला पुष्पहार घालत रंग लावून अभिवादन केले आणि कार्यकर्त्यांसोबत धुळवड साजरी केली.
- 02:54 PM • 25 Mar 2024बीडचे पार्सल बीडला पाठवा, सोलापूरचे भाजपा उमेदवार राम सातपुते ट्रोल
राम सातपुते यांचा जन्म 12 मार्च 1988 रोजी महाराष्ट्र राज्यातील बीड मधील डोईठाण या गावी ऊस तोडणी करणाऱ्या एका मराठी कुटुंबात झाला. पण ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे आमदार आहे. यामुळे सोलापूर लोकसभेचे भाजप उमेदवार राम सातपुते यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून ट्रोल केलं जात आहे. 'बीडचे पार्सल बीडला परत पाठवा', अशा आशयाचे स्टेटस आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
- 12:31 PM • 25 Mar 2024Lok Sabha Elections 2024 : "आमदार करेपर्यंत त्याला हुकुमशाही दिसली नाही", वडेट्टीवारांचा चढला पारा
राजू पारवे यांनी आमदारकी आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेसमधील हुकुमशाहीला कंटाळून पक्ष सोडला असे ते म्हणाले. त्याला उत्तर देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, "काही लोकांना सत्तेमुळे शहाणपण सुचतं. तेही उशिरा सुचतं. त्याला ते कळलं असेल. पक्षात आणून, उमेदवारी देऊन, आमदार करेपर्यंत त्याला हुकुमशाही दिसली नाही. आता लोकसभेची उमेदवारी गळ्यात पडताच त्याला काँग्रेसची हुकुमशाही दिसते. मला असं वाटतं की, गाढव घोड्याचा आवाज काढतोय, असा तो प्रकार आहे."
- 11:46 AM • 25 Mar 2024'सोलापूरची लेक तुमचंही सोलापुरात स्वागत करते..!'- प्रणिती शिंदे
सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे.
- 11:05 AM • 25 Mar 2024बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षाला वाढता विरोध
बारामती लोकसभा मतदारसंघात संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवारांना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा ही विरोध पाहायला मिळतोय. खडकवासला विधानसभा मतदार संघातील शिवसेनेला विचारात घेत असल्याने नाराजी पाहायला मिळतेय. बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करायचा नसून पुणे लोकसभेतील मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार करूया, असा मेसेज शिवसेना पदाधिकाऱ्याने शिवसैनिकांना दिला आहे. सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने व्हॉट्सअप ग्रुपवरील तो msg व्हायरल झाला आहे.
- 11:04 AM • 25 Mar 2024उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात भस्म आरतीदरम्यान भीषण आग
मध्य प्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या महाकाल मंदिराच्या गर्भगृहात आज भस्म आरतीदरम्यान आग लागली. या आगीच्या घटनेच पुजाऱ्यासह १३ जण जखमी झाले आहेत. आरतीच्या वेळी गुलाल उधळल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली. यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या घटनेदरम्यान गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती देताना उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. या घटनेत लोक किरकोळ भाजले. कोणीही गंभीर जखमी नाही.
- 10:54 AM • 25 Mar 2024'ठाकरे गटाची उमेदवारी यादी उद्या जाहीर करणार'- संजय राऊत
'अरविंद केजरीवाल आता जास्त मजबूत झाले आहेत. लोक केजरीवालांच्या पाठिशी उभे राहतील. तर कंगनाचे विचार भाजपशी मिळते-जुळते आहेत. कुणाला विजयी करायचं हे लोक ठरवणार. भाजप हा मोठा पक्ष नाही. उद्या आमच्याकडे सत्ता येईल तेव्हा तुमचा पक्षही राहणार नाही. भाजपने दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडलं. ठाकरे गटाची उमेदवारी यादी उद्या जाहीर करणार आहे. प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी आम्ही जिंकू. १५ ते १६ जणांची नावं आम्ही उद्या जाहीर करणार.' असं संजय राऊत स्पष्ट म्हणाले.
- 09:43 AM • 25 Mar 2024नांदेडच्या तिन्ही भाजप खासदारांनी तांड्यावर जाऊन नृत्य करत साजरा केला होळीचा सण..
देशभरात होळी जाळून रंगपंचमी साजरा करत आहे दुसरी कडे नांदेड जिल्ह्याभरात मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केल्या जात आहे.भाजप खासदार अशोक चव्हाण आणि लोकसभेचे उमेदवार खा प्रताप पाटील चिखलीकर यांनी नांदेडमधील वेगवेगळ्या तांड्यावर जाऊन होळीचा सण साजरा केलाय . पारंपरिक बंजारा समाजामध्ये बंजारा वेशभूषा घालत होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच अनुषंगाने भाजपने तांड्यावर जाऊन होळी साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यानुसार खासदार चिखलीकर आणी खा चव्हाण , आजित गोपचडे यांनी तांडावर जाऊन बंजारा समाजा सोबत नृत्य करत होळी साजरी केली. यावेळी व्यसनमुक्तीचा संदेश देत बंजारा समाजाकडून वेसण मुक्ती ची होळी दहन देखील करण्यात आले.
- 09:42 AM • 25 Mar 2024काठीच्या राजवाडी होळीत रंगले आदिवासी बांधव! 5 दिवस चालणार मोठा उत्सव
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील ऐतिहासिक राजवाडी होळी म्हणून प्रसिद्ध...
आदिवासी समाज जीवनातला सर्वात महत्त्वपूर्ण असलेला होळीचा सण सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये मोठ्या उत्साहात पार पडतोय. नंदुरबार जिल्ह्यातल्या सातपुडामध्ये साजरी होणारी काठीची राजवाडी होळी मोठ्या थाटात संपन्न झाली. या होळीनंतर सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये आता आगामी पाच दिवस होळीची धूम पाहायला मिळेल.
- 09:33 AM • 25 Mar 2024'ठाकरेंनी ओमर अब्दुल्लांना...', श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल!
'ज्या लोकांनी इतके वर्ष हिंदुत्वाच्या नावाखाली मराठी माणसाच्या नावावर राजकारण केलं अशा लोकांना देखील मला प्रश्न विचारायचा आहे, ज्या इंडिया अलायन्समध्ये तुमच्यासोबत ओमर अब्दुल्ला आहेत त्यांना एका शब्दात विचारण्याची हिमंत ठेवा. ठाकरेंनी ओमर अब्दुल्लांना ओमर अब्दुल्लांना जाब विचारण्याची हिम्मत ठेवावी.' असं म्हणत श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT