लाइव्ह

Maharashtra News Updates : 'पवारांनी पुरावे द्यावे नाहीतर...', शरद पवारांच्या वक्तव्यानंतर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया!

मुंबई तक

07 Mar 2024 (अपडेटेड: 07 Mar 2024, 04:25 PM)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाडींच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे. याविषयीचे सविस्तर अपडेट मुंबई तकच्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Mumbaitak
follow google news

Marathi News Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असतानाच महायुतीमध्ये जागा वाटपावरून चर्चा सुरू असतानाच लोकसभेच्या जागा वाटपावरून शिवसेना व भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी, 'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती विश्वास ठेवून भाजपासोबत आलो आहोत त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका याची समज त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी असं सांगत माझेही नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा,' असा सज्जड इशाराच त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

लाइव्हब्लॉग बंद

  • 05:13 PM • 07 Mar 2024
    मनोज जरांगेंसह 200 समाज बांधवांवर गुन्हा दाखल

    बीड मध्ये मनोज जरांगे पाटील हे दिनांक पाच मार्च रोजी बीड जिल्हा दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्या दरम्यान विनापरवाना रॅली काढल्यामुळे बीड पोलिसांकडून स्वतः फिर्यादी होऊन मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटलांसह 200 मराठा समाज बांधवांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्हा दाखल झालेल्या मराठा बांधवांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी.

  • 05:11 PM • 07 Mar 2024
    शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामीन फेटाळला

    मालेगाव न्यायालयाने शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांचा जामिन फेटाळला आहे. रेणुका सुत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणात हिरे तीन महिन्यांपासून कारागृहात आहेत.

  • 05:11 PM • 07 Mar 2024
    शरद पवार मोठे नेते, त्यांनी दिलेली धमकी योग्य नाही

    शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांनी दिलेली धमकी योग्य नाही. त्यांना या वक्तव्याचा पुन्हा विचार करावा. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 04:24 PM • 07 Mar 2024
    'पवारांनी पुरावे द्यावे नाहीतर...', शरद पवारांच्या वक्तव्यानंतर सुनील शेळकेंची प्रतिक्रिया!

    तुझ्या सभेला कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म, चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते ती सही माझी आहे. सही केलीए त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता. असं शरद पवार म्हणाले होते. आता त्यांच्या या वक्तव्यानंतर सुनील शेळकेंनी पवारांना थेट आव्हान दिलं आहे. शेळके म्हणाले की, 'कुणाला दम दिला? एक तरी व्यक्ती आणून दाखवा. अजितदादांनी मला निधी दिला, त्यांच्यामागे का उभं राहू नये? मी कोणाला दम दिला, कोणाला फोन करून सांगितलं की, साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका.. असा एक तरी व्यक्ती साहेबांनी उभा करावा. पुराव्यानिशी त्यांनी माहिती द्यावी नाहीतर, मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की पवार साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. ' 
     

  • 02:52 PM • 07 Mar 2024
    'महायुतीच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं'; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका!

    लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा धाराशिव मतदारसंघात दौरा आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'माझ्या सभेला मैदानं गच्च भरलेली असतात. मुख्यमंत्र्यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या असतात. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टोला लगावला. पुढे म्हणाले की, 'माझ्या सभेला गर्दी, त्यामुळे मी सीएम नाही हे मला माहिती आहे. महाराष्ट्र चवताळलाय, निवडणुकांची वाट पाहत आहे. शिवसेना संपणार नाही, भाजपला मुठमाती देईल. तसंच उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा नागोबा असा उल्लेख केला. महायुतीच्या सरकारला भ्रष्टाचाराची चाकं लागली आहेत. मोदींना कुणी ओळखत नव्हतं तेव्हाही आपण धाराशिव जिंकत होतो, बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी कुठे दिसलेही नसते. शिंदेंनी स्वत:च्या वडिलांचा फोटो लावून मतं मागावीत. माझं कुटुंब, माझी जबाबदारी असं मी म्हणालो होतो. मोदींनी माझा परिवार असं सांगितलं, पण जबाबदारी कोण घेणार?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला चांगलच सुनावलं.  

  • 02:11 PM • 07 Mar 2024
    पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात झाली मोठी वाढ

    गेल्या वर्षीच्या तुलनेत 2100 कोटीने बजेट वाढलं. महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी अर्थसंकल्प केला सादर 11 हजार 601 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प. नव्याने गाव समाविष्ट झाली आहेत 550 कोटी रुपये बजेट ठेवला आहे.

  • 01:49 PM • 07 Mar 2024
    "शरद पवार म्हणतात मला..", सुनील शेळकेंना चांगलच सुनावलं!

    सुनील शेळकेंना इशारा देताना शरद पवार म्हणाले, "तू आमदार कोणामुळं झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? तुझ्या फॉर्म, चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते ती सही माझी आहे. ज्यानं ही सही केलीए त्याचेच कार्यकर्ते तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला त्यांनाच आज तुम्ही दमदाटी करता. माझी तुम्हाला विनंती आहे की, एकदा तुम्ही दमदाटी केलीत आता बास्स, पुन्हा जर असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला.."

  • 12:10 PM • 07 Mar 2024
    अजित पवारांना मोठा धक्का! लोणावळ्यात 137 पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

    लोकसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. अनेक मोठे नेते तिकीटासाठी पक्ष बदलत असून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून अनेक जणांनी शरद पवार गट सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. मावळमध्ये अजित पवार गटात नाराज असलेल्या 137  कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला  आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाचा राजीनामा दिला होता.

  • 11:37 AM • 07 Mar 2024
    मुख्यमंत्री आज घेणार कल्याण लोकसभेचा आढावा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी घेणार कल्याण लोकसभेचा आढावा. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून खासदार आहेत. आज दुपारी तीनच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात मतदार संघातील विविध विषयांबाबत बैठक घेत घेणार आढावा

     

  • 10:56 AM • 07 Mar 2024
    धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांचं निवडणूक आयोगाला पत्र

    धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहीत लोकसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन मागविले आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाकडून जास्त उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे. जास्त उमेदवारी अर्ज आल्यास ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागतील त्यामुळे या स्तिथीची पुर्वकल्पना देत काय उपाययोजना कराव्यात याबाबत जिल्हाधिकारी यांनी पत्र लिहले आहे.
     

  • 10:01 AM • 07 Mar 2024
    सप्तहिंदकेसरी मन्या बैलाच्या दशक्रियेला मोठी गर्दी

    खेड तालुक्यातील वाफगाव येथे मन्या बैलाचा दहा दिवसांपुर्वी अंत्यविधी झाला होता. त्याच्या दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात मन्या बैलाच्या आठवणीतले अश्रू कोसळसले. राजू जवळेकर यांनी पोटच्या लेकराप्रमाणे मन्या बैलाचा संभाळ केला होता.बैलगाडा घाटात खेळाडु वृत्तीने धावणाऱ्या मन्याचे अनेक रेकॉर्ड मन्यानेच मोडले काढले होते.आणि करोडो रुपयांची बक्षिसे सुद्धा त्याने पटकावली होती.असा खेळाडू आपल्यातून  हरपल्याच्या भावना व्यक्त करत मन्याचा पुनर्जन्माप्रमाणे पुतळा उभारला. आता मन्याचा पुनर्जन्म हा खेळाडूतुनच व्हावा अशी शेवटीची इच्छाही व्यक्त करण्यात आली आहे.
     

  • 09:44 AM • 07 Mar 2024
    आपल्याच मनाप्रमाणे व्हावं, हा हट्ट सोडावा- संजय राऊत

    'आघाडीमध्ये सगळ्यांच्या मनाप्रमाणे होत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने आपले अनेक हट्ट सोडले आहेत. आपल्याच मनाप्रमाणे व्हावं हा हट्ट सोडावा. काल सकारात्मक चर्चा झाली आहे. आम्ही वंचितचं पूर्ण समाधान करण्याचं ठरवलं आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्ज येत आहेत.' असं संजय राऊत माध्यमांसमोर बोलले.

  • 09:31 AM • 07 Mar 2024
    भाजप आणि बच्च कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते भिडले

    अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजप आणि बच्चू कडू यांच्या प्रहारचे कार्यकर्ते आमने सामने आले. कामगार कल्याण विभागाने साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम लवकर न सूरु झाल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यावेळी प्रहार आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले; कामगारांना कीट वाटप करण्यात येणारा कार्यक्रम रद्द करण्यात आला. प्रहार आणि भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

follow whatsapp