पुणे: पुणे (Pune) जिल्ह्यातील जेजुरी (Jejuri) येथे एक अत्यंत विचित्र घटना समोर आली आहे. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीसह तिच्या मैत्रिणीची देखील हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pune Girlfriend Murder) मिळालेल्या माहितीनुसार, प्रेयसी ही प्रियकरासह त्याच्या घरातील लोकांना देखील सातत्याने त्रास देत होती. त्यामुळे प्रेयसीपासून पिच्छा सोडविण्यासाठी प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणीचा अपघात (Accident) घडवून आणला.
ADVERTISEMENT
या अपघातात दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना जेजुरी पोलीस स्टेशन परिसरात घडली असून याप्रकरणी पोलिसांनी चालकासह तीन जणांना अटक केली आहे.
1 एप्रिलला बारामती जवळील नीरा गावात एक अपघात झाला होता. मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या दोन महिलांना नंबर प्लेट नसलेल्या एका स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या होता. त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, दोघींच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या अपघातप्रकरणी जेव्हा तपास सुरू केला तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट समजली.
प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पोलिसांनी अशी सोडवली मर्डर मिस्ट्री
जेजुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडिक यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितलं की, ‘अपघात मरण पावलेल्या एका महिलेशी आरोपी किरण जेधे याचे अनैतिक संबंध होते. हीच महिला किरण जेधे आणि त्याच्या घरातील लोकांना सतत त्रास देत होती. फक्त या कारणामुळेच आरोपी किरणने या महिलेला धडा शिकवण्यासाठी एक खतरनाक प्लॅन आखला. यावेळी किरण जेधेने दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावातील 23 वर्षीय संकेत होले याला या महिलेला संपवण्याची सुपारी दिली.’
रेखा जरेंची हत्या ते बाळ बोठेची अटक,
जाणून घ्या घटनाक्रम
संकेत होले हा एक सराईत गुन्हेगार आहे. अनेक प्रकरणांमध्ये फरार असताना त्याला किरण जेधे हाच आपल्याकडे आश्रय द्यायतचा. त्यामुळेच ते दोघेही एकमेकांचे अगदी खास मित्र होते. संकेतने हे काम पार पाडल्यास त्याला दौंडमध्ये हॉटेल बनविण्यासाठी आपण पैशाची मदत करु असं आश्वासन किरण जेधे यांनी दौंडमध्ये हॉटेल बनवण्यासाठी पैशांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते.
त्यामुळेच संकेत होले हा आपल्या स्विफ्ट कारसह नीरा येथे पोहचला. 1 एप्रिल रोजी सकाळी संबंधित महिला आणि तिची मैत्रीण हे मॉर्निंग वॉकसाठी निघालेले असताना स्विफ्ट कारने त्यांना जोरदार धडक दिली.
ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही महिला या गंभीररित्या जखमी झाल्या. तर अपघातानंतर चालक फरार झाला. जेव्हा या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आणि पोलिसांनी सखोल तपास सुरु केला तेव्हा पोलिसांना गाडीचा चालक संकेत होले आणि त्याला मार्गदर्शन करणारा रणजित जेधे हे गेले अनेक दिवस सातत्याने मोबाइलद्वारे संपर्कात असल्याचं समजलं. त्यानुसार पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
दरम्यान, या चौकशीतून पोलिसांना अशी माहिती मिळाली की, या घटनेचा मुख्य सूत्रधार हा किरण जेधे हा आहे. अखेर पोलिसांनी किरण जेधेला अटक करुन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा त्याने पोलिसांना असा जबाब दिला की, त्याचे आणि मृत महिलेचे गेल्या 2 वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यामुळे ही महिला किरणच्या घरातील सदस्यांना सातत्याने त्रास देत होती. यालाच वैतागून किरणने तिच्या हत्येचा कट रचला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून जेजुरी पोलीस पुढील तपास करीत आहेत. (lover killed his girlfriend by pretending that there was an accident in jejuri in pune district)
ADVERTISEMENT