देशाच्या अर्थव्यवस्थेची ४० वर्षांतली निराशाजनक कामगिरी, भारताच्या विकासदराचा निचांक

मुंबई तक

• 02:42 AM • 01 Jun 2021

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम जाणवतो आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतली निचांकी कामगिरी नोंदवली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यस्थेला जोरदार फटका बसलाय, ज्याचा परिणाम २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर – ७.३ टक्के इतका खाली घसरला आहे. ४० वर्षांपूर्वी म्हणजेच १९७९-८० या आर्थिक वर्षात विकासदरात – ५.२ इतकी घसरण […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम जाणवतो आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतली निचांकी कामगिरी नोंदवली आहे. कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यस्थेला जोरदार फटका बसलाय, ज्याचा परिणाम २०२०-२१ या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर – ७.३ टक्के इतका खाली घसरला आहे.

हे वाचलं का?

४० वर्षांपूर्वी म्हणजेच १९७९-८० या आर्थिक वर्षात विकासदरात – ५.२ इतकी घसरण झाली होती. यानंतर प्रथमच देशाच्या विकासदरात एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं. सप्टेंबर २०२० मध्ये भारतात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त असतानाच देशाचा विकासदर हा उणे स्थितीत नोंदवला गेला.

यानंतर पुढचा काही काळ विकासदराची घसरण अशीच सुरु होती. लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून २०२० मध्ये हा विकासदर – २४.४ इतका नोंदवला गेला, तर तिसऱ्या तिमाहीत तो शून्यावर आला. चौथ्या तिमाहीत विकासदराने १.६ टक्क्याच्या रुपात थोडी मुसंडी मारली होती. परंतू यानंतर पुन्हा एकदा विकासदरात घसरण झालेली पहायला मिळते आहे.

गेल्या वर्षांतली भारतीय विकासदराची कामगिरी अशी राहिली –

  • २०२० – २१ आर्थिक वर्ष : – ७.३ टक्के

  • जानेवारी ते मार्च २०२१ : १.६ टक्के वाढ

  • ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० : ०.४ टक्के वाढ

  • जुलै – सप्टेंबर २०२० : – ७.३ टक्के

  • एप्रिल – जुन २०२० : – २४.४ टक्के

    follow whatsapp