लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये 16 वर्षीय मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. या घटनेची अवघ्या देशात चर्चा सुरु आहे. कारण फक्त PUBG खेळण्याच्या वादातून मुलाने आईला संपवल्याची ही खळबळजनक घटना आहे. आरोपी मुलाचे वडील हे लष्करात आहेत आणि जेव्हा घटना घडली तेव्हा ते आसनसोलमध्ये तैनात होते.
ADVERTISEMENT
या एका घटनेने संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोपी मुलाच्या वडिलांनी ‘आज तक’शी बोलताना संपूर्ण घटनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी असंही म्हटलं की, काही तरी अघटीत घडणार असा मला सातत्याने भास होत होता. ज
वडील म्हणाले की, ‘मला आधीच जाणवत होतं की, माझ्या मुलाचं वागणं हे योग्य नाही आणि तो कोणत्याही क्षणी त्याच्या आईची हत्या करु शकतो. त्यामुळेच मला तात्काळ लखनऊला परत यायचं होतं. पण सुट्टी मिळत नसल्याने मी घरी येऊ शकलो नाही. घरी वीज बिलाबाबत नोटीस आली होती आणि कनेक्शन कापण्याबाबत तंबी देण्यात आली होती. ज्यामुळे माझी पत्नी आधीच त्रस्त होती.’
पुढे ते म्हणाले की, ‘माझं तिच्याशी शेवटचं बोलणं 4 तारखेला झालं होतं. तेव्हा पत्नीने मला सांगितलं होतं की, बिल भरण्यास जाणार आहे. पण आणखी एक गोष्ट म्हणजे मुलगा दिवसभर मोबाइलच घेऊन बसलेला असतो. त्याला ओरडल्यास तो अजिबात ऐकत नाही. त्यादिवशी स्कूटी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. पण मी त्याला अडवलं तेव्हा त्याने माझ्याशी खूप भांडण केलं.’
वडील पुढे म्हणाले, ‘जेव्हा-जेव्हा माझं त्याच्या मुलांशी बोलणं व्हायचं तेव्हा मी त्याला सांगायचो की, आईसोबत अजिबात भांडण करु नको. ती जे सांगेल ते ऐकत जा. पण यावेळी तो काहीही बोलायचा नाही. हो किंवा नाही यापैकी काहीही उत्तर द्यायचा नाही. असंच ऐके दिवशी माझ्याशी बोलताना तो अचानक म्हणाला की, मी तिला मारुन टाकेल. मला तिचा खूप राग आला आहे.’
PUBG च्या नादात आईची गोळी झाडून हत्या, खुनी मुलाने अंडा करी मागवत मित्रांसोबत केली पार्टी
‘मी रविवारी फोन केला तर मुलगा मला म्हणाला की, आई वीज बिल भरण्यास गेली आहे. मलाही त्यावेळी वाटलं की, बायको खरंच बिल भरण्यासाठी गेली असेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा काही वेळाने फोन केला. तर मुलाने पुन्हा मला सांगितलं की, आई शेजारी गेली आहे. तर मी म्हणालो की, तुझ्या बहिणीला फोन दे. तर यावर तो एवढंच म्हणाला की, नंतर देतो तिला फोन. ज्यानंतर माझं त्याच्याशी काहीही बोलणं झालं नाही.’ असं आरोपी मुलाच्या वडिलांनी यावेळी सांगितलं.
‘मला मनातून फारच भीती वाटू लागली. काही तरी चुकीचं घडतंय असं मला सातत्याने वाटू लागलं. कारण माझ्या मुलाचा हेतू खूपच भयंकर होता. त्यामुळे मी त्याच्या ट्यूशन टीचरला फोन केला आणि त्यांना सांगितलं की, कृपया तुम्ही माझ्या घरी जाऊन पाहा की काय सुरु आहे. ज्यानंतर ट्यूशन टीचर देखील घरी गेले. त्यांना तिथे असं आढळून आलं की, घर बंद आहे, स्कूटी बाहेर उभी नाही. तसंच दरवेळेस जो कुत्रा घरातच असतो त्याला बाहेर बांधलेलं होतं.’
‘स्कूटी घराबाहेर नसणं आणि कुत्रा बाहेर बांधलेला असल्याचं समजताच मला शंका आली. मी विचार करत होतो की, एक-दोन दिवसाची सुट्टी घेऊन मी घरी जावं. पण मला काही जाता आलं नाही. त्यानंतर मी सकाळी उठल्यानंतर फोनच करणार होतो की, अचानक माझ्या फोनवर मुलाचा फोन आला आणि त्याने मला सांगितलं की, पप्पा घरात मागच्या बाजूने कुणीतरी घुसलं आणि त्याने मम्मीला मारुन टाकलं.’
‘त्यावेळी माझ्या तोंडून निघून गेलं की, हरामखोर तूच मारलं असणार तुझ्या आईला. ज्याची मला भीती होती तेच घडलेलं. भले मुलगा मला काहीही सांगितलेलं असो पण मला या घटनेमागचं नेमकं सत्य काय ते माहीत होतं.’ असं वडिलांनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT