–इम्तियाज मुजावर, सातारा
ADVERTISEMENT
सातारा-पुणे मार्गावरील खांबाटकी बोगद्याजवळ असलेल्या पुढील उतारावर लक्झरी बसचं ब्रेक फेल झाल्यानं भीषण अपघात झाला. बसचा ब्रेक निकामी झाल्यानंतर पाच गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात टाटा स्टॉर्म व महिंद्रा मॅक्स जीपचे प्रचंड नुकसान झालं आहे.
मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रविवारी दुपारी ४.१५ वाजताच्या सुमारास पुण्याकडे निघालेल्या लक्झरी बस (MH09,CV9207) ही खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यावर उतारावर बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
नंतर बसने पुढे चाललेल्या टाटा स्टॉर्म (MH12,LJ3643) महिंद्रा मॅक्स जीप (MH12,EF5066) बजाज मोटार सायकल (MH09,CP5047) आणि लक्झरी बस (MH46,BB9564) या वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात टाटा स्टॉर्म व महिंद्रा मॅक्स या दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं. सुदैव म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या अपघातात बस रस्त्यातच आडवी झाली. त्यामुळे तासभर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
दुर्घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहनं बाजूला करण्यात आली.
खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, वाहतूक पोलीस विठ्ठल पवार, शरद यादव, एएसआय अहेरराव, पी. एस. फरांदे, ए.एम. जाधव, एस.डी. जाधव, एस. ए. मोरे, विजय पिसाळ यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.
ADVERTISEMENT