MP Assembly Election Results 2023: मध्य प्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला थेट नाकारलं, भाजपच्या हाती पुन्हा सत्तेच्या चाव्या
रोहित गोळे
03 Dec 2023 (अपडेटेड: 08 Dec 2023, 06:46 AM)
MP Assembly Assembly Elections Results Live: मध्य प्रदेशमध्ये मतदान 25 नोव्हेंबर रोजी झाल्यानंतर आता येथे कोणतं सरकार येणार हे आज (3 डिसेंबर) स्पष्ट होणार आहे. 2018 साली राज्यातील जनतेने काँग्रेसला सत्ता दिली होती. मात्र, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीमुळे भाजपने पुन्हा सत्ता मिळवली होती. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजप पुन्हा सत्ता काबीज करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, मध्य प्रदेशच्या जनतेने नेमका काय कौल दिला आहे हे आपल्याला थोड्याच वेळात समजणार आहे. (madhya pradesh assembly elections 2023 live updates live election results 2023 wining candidates list)
2018 मध्ये असा होता निकाल
मध्य प्रदेशातील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 114 जागा जिंकल्या होत्या, भाजपने 109, बसपा 2 आणि अपक्ष आणि इतरांनी 5 जागा जिंकल्या होत्या.. त्यानंतर बसपा आणि अपक्षांच्या पाठिंब्याने काँग्रेसने सरकार स्थापन केले होते. तथापि, 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडली, त्यामुळे काँग्रेसचे कमलनाथ सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री झाले.
ADVERTISEMENT
madhya pradesh assembly elections 2023 live updates live election results 2023 wining candidates list
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 12:20 PM • 03 Dec 2023मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला जनतेने नाकारलं, भाजपकडे सत्तामध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता.. काँग्रेसला जनतेनं नाकारलं.. सध्या भाजप 157 जागांवर आघाडीवर काँग्रेसला फक्त 70 जागांवर आघाडी
- 11:06 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेशमध्ये भाजपची लाटमध्य प्रदेशमध्ये भाजपला पुन्हा एकदा मोठं यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची धूळधाण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या मध्य प्रदेशात भाजप 157 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर.
- 09:54 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेशमध्ये भाजपची मजबूत स्थितीमध्य प्रदेशमध्ये भाजप सध्या मजबूत स्थितीत असल्याचं पाहायला मिळतं आहे. कारण सध्या भाजप 130 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 98 जागांवर आघाडीवर आहे.
- 09:47 AM • 03 Dec 2023चंबळमध्ये भाजप आणि काँग्रेस समसमान जागांवर आघाडीवरमध्य प्रदेशातील चंबळमध्ये भाजप आणि काँग्रेस हे 17-17 अशा समसमान जागांवर आघाडीवर आहे.
- 09:38 AM • 03 Dec 2023माजी मुख्यमंत्री कमलनाथ पिछाडीवरमध्य प्रदेश एकीकडे भाजप सत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना दुसरीकडे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे छिंदवाडा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.
- 09:19 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेशमध्ये भाजपची जोरदार मुसंडीमध्य प्रदेशमध्ये भाजपला जनतेने चांगला प्रतिसाद दिल्याचं प्राथमिक कलानुसार पाहायला मिळत आहे. आतापर्यंत भाजप 132 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस फक्त 89 जागांवर आघाडीवर आहे.
- 09:13 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्करमध्य प्रदेशमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. प्राथमिक कलांमध्ये भाजप काहीसं पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे.
- 08:45 AM • 03 Dec 2023मध्य प्रदेशमध्ये कोण मारणार बाजी?मध्य प्रदेशमधील मतमोजणीला थोड्याच वेळापूर्वी सुरुवात झाली असून सध्या बॅलेट पोस्ट मतमोजणी सुरू झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT