महाविकास आघाडी सरकारही सुप्रीम कोर्टात जाणार, राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न सुटणार?

मुंबई तक

• 11:31 AM • 29 Jan 2022

राकेश गुडेकर, रत्नागिरी: भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रलंबित प्रश्नाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी आपण पुढाकार घेऊन सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. याबाबत […]

Mumbaitak
follow google news

राकेश गुडेकर, रत्नागिरी: भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकार राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रलंबित प्रश्नाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी आपण पुढाकार घेऊन सरकारच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते.

हे वाचलं का?

याबाबत बोलताना सामंत म्हणाले की, ‘विधिज्ञांचा सल्ला घेऊन आपण यासाठी स्वतः पुढाकार घेणार आहोत. नितीन बानगुडे पाटील यांच्या माध्यमातून मी स्वतः दाद मागण्याचा विचार करत आहे. 12 आमदारांचे निलंबन रद्द झालं आहे, या पार्श्वभूमीवर आम्हाला देखील न्याय मिळेल यासाठी हा प्रयत्न असणार आहे.’

‘यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात सर्वांशी चर्चा करणार आहोत. पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा झाली आहे.’ असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

12 आमदारांच्या निलंबनाचं नेमकं प्रकरण काय होतं?

5 जुलै 2021 रोजी विधानसभेचं कामकाज सुरू असताना डॉ. संजय कुटे, अॅड. आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, अतुल भातखळकर, अॅड. पराग अळवणी, हरिश पिंपळे, राम सातपुते, जयकुमार रावल, योगेश सागर, नारायण कुचे, किर्तीकुमार उर्फ बंटी बागडिया यांनी सभागृहात गैरवर्तन केलं. सभागृहात पीठासीन अधिकाऱ्यांना उद्देशून अर्वाच्च भाषण केलं होतं. तसेच माईक आणि राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला होता.

वारंवार सूचना देऊनही सभागृह तहकूब झाल्यानंतरही माननीय अध्यक्षांच्या दालनात पुन्हा एकदा सगळ्या सदस्यांनी गैरवर्तन केलं होतं. तालिका पीठासीन अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोपही या आमदारांवर करण्यात आला होता. सभागृहाची परंपरा मलीन करणारे अत्यंत अशोभनीय आणि बेशिस्त वर्तन केल्यामुळे या सगळ्या सदस्यांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं होतं. पण आता हेच निलंबन सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवलं आहे.

निलंबन रद्द केलेल्या ‘त्या’ 12 आमदारांना पाहा कोर्टाने काय सुनावलं!

उदय सामंतांचा चंद्रकांत पाटलांवरही निशाणा

शिवसेना आणि काँग्रेसला राष्ट्रवादी खाऊन टाकेल या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाबाबतही मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर प्रहार केला आहे.

‘तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. या आघाडीत बिघाडी करण्याचा विचार काही जण करत आहेत. हे सरकार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पण त्यांच्या या विधानाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने बघतो. महाविकास आघाडी भक्कम आहे. आपले कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नयेत म्हणून अशी विधाने केली जात आहे.’ असं म्हणत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

    follow whatsapp