सुधीर मुनगंटीवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टीका केली. महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे एक प्रकारचा राजकीय लव्ह जिहाद आहे. लव्ह जिहादमध्ये जसं फसवलं जातं अगदी तसंच फसवणूक करून हे सरकार आलं आहे. परवाच मी बारामतीला पाहिलं तिथे टॉमेटो आणि बटाटे एकाच झाडाला आलेले पाहिले. त्यानंतर मला एका गोष्टीची साक्ष पटली की बारामतीकर काहीही करू शकतात. टोकाचे विरोधी मतं असलेले पक्षही एकत्र येऊ शकतात. बारामतीकरांनी ठरवलं तर ते उत्तर आणि दक्षिण ध्रुवही एकत्र आणू शकतात असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
पाहा सुधीर मुनगंटीवार यांचं भाषण
सुधीर मुनगंटीवार बोलत असताना अनिल परब मधे बोलले त्यावेळी त्यांनी उदाहरण दिलं की आपली मैत्री तीस वर्षांची आहे. आपल्यातली मैत्री विसरू नका. अजित पवारांसोबत आमची मैत्री ७२ तासांची मैत्री आहे तरीही आमचं दादांवर मैत्री आहे. दोस्त दूर भी होता है तो उसे समझाना होता है. असंही सुधीरभाऊ म्हणाले. पेपरमध्ये ०१ मार्क मिळाल्यावर पेपर आरशात धरायचा आणि १० मार्क मिळाले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घ्यायची. असा प्रकार या सरकारने ठाकरे सरकारने कोरोनाच्या बाबतीत केला आहे असाही टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. उत्तर प्रदेशात मृत्यू झाले ८ हजारांपेक्षा जास्त आणि महाराष्ट्रात कोरोना मृत्यू किती झाले? ५२ हजारांपेक्षा जास्त. यासाठी स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे का? असाही प्रश्न सुधीरभाऊंनी विचारलं.
गुजरात क्रिकेट असोसिएशनने मोदींचं नाव एका स्टेडियमला दिलं. त्यावरून मोदींवर टीका झाली, त्यांना हिटलर संबोधलं गेलं. मग मला आश्चर्य वाटलं की मुख्यमंत्री ज्या बैठकीला जातात त्या बैठकीत शरद पवार ग्राम समृद्धी योजनेला मान्यता दिली. मोदींचं नाव स्टेडियमला दिलं तर ते हिटलर. मग शरद पवार यांचं नाव दिल्याचं काय? बरं शरद पवारांचं नाव मोठ्या तरी योजनेला द्यायचं. सहा गुरांचा गोठा बारा गुरांसाठी बांधायचं ठरलं त्याला नाव तुम्ही शरद पवारांचं देता? किमान योजना तर मोठ्या ठेवा असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी टोलेबाजी केली.
तुम्ही गाय मारलीत ना? मग आम्ही वासरू मारणार या धोरणाने सरकार सध्या वागतं आहे असाही आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.
ADVERTISEMENT