साधू-संत, संपत्ती आणि हत्या.. आत्तापर्यंत अनेक साधू-संतांना गमवावा लागला आहे जीव

मुंबई तक

• 05:11 PM • 21 Sep 2021

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू 20 सप्टेंबरला झाला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक उल्लेख आहेत. खास करून त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या विषयी उल्लेख आहेत. हे सुसाईड नोट सात ते आठ पानांचं आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. नरेंद्र गिरी यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस ही आत्महत्या असल्याचं म्हणत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू 20 सप्टेंबरला झाला. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये अनेक उल्लेख आहेत. खास करून त्यांचा शिष्य आनंद गिरी यांच्या विषयी उल्लेख आहेत. हे सुसाईड नोट सात ते आठ पानांचं आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे. नरेंद्र गिरी यांचा मृत्यू कसा झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस ही आत्महत्या असल्याचं म्हणत आहेत. तर अनेक जणांना यामागे कट आहे आणि ही हत्या आहे असं वाटतं आहे. हा सगळा वाद संपत्तीचा आहे असंही बोललं जातं आहे.

हे वाचलं का?

संत, संपत्ती आणि खुनाचे कट अशा सगळ्या घटना याआधीही घडल्या आहेत. ज्यामध्ये अनेक साधूंना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. नरेंद्र गिरी यांच्या बाबत घडलेली ही पहिली घटना नाही.

90 च्या दशकात अशीच एक घटना घडली होती. 1991 मध्ये एका संताची हत्या झाली होती. 25 ऑक्टोबर 1991 ला रामायण सत्संग भवनचे संत राघवाचार्य हे आश्रमाच्या बाहेर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी स्कूटरवरून आलेल्या काही जणांना त्यांना घेरलं आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चाकूनेही वार केले आणि त्यांची अत्यंत निर्घृण हत्या केली.

हत्येची ही मालिका इथूनच सुरू झाली होती. यानंतर 9 डिसेंबर 1993 ला संत राघवाचार्य यांचे सहकारी रंगाचार्य यांचीही ज्वालापूरमध्ये हत्या करण्यात आली. यानंतर हरिद्वारमध्ये चेतनादास आश्रमाता अमेरिकी साध्वी प्रेमानंद यांची डिसेंबर 2000 मध्ये हत्या करण्यात आली. हत्येच्या आधी त्यांना लुटण्यात आलं होतं.

महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा नाशिकच्या साधू संताची मागणी

या घटनांप्रमाणेच घडलेल्या घटना-

5 एप्रिल 2001 ला हरिद्वार मध्ये बाबा सुतेंद्र बंगाली यांची हत्या करण्यात आली

6 जून 2001 ला हर की पैडीच्या समोर बाबा विष्णुगिरी यांची चार साधुंची हत्या करण्यात आली

26 जून 2001 ला बाबा ब्रह्मानंद यांची हत्या करण्यात आली

2001 मध्ये पानप देव आश्रमाचे बाबा ब्रह्मदास यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली

17 ऑगस्ट 2002 ला बाबा हरियानंद आणि त्यांचे शिष्य या दोघांची हत्या करण्यात आली. यानंतर एक संत नरेंद्र दास यांनाही संपवण्यात आलं.

6 ऑगस्ट 2003 ला संगमपुरी आश्रमाचे प्रख्यात संत प्रेमानंद उर्फ भोलेबाबा गायब झाले. 7 सप्टेंबर 2003 ला त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं आणि आरोपी गोपाल शर्माला अटक झाली.

28 डिसेंबर 2004 संत योगानंद यांची हत्या झाली. त्यांचे मारेकरी अद्यापही पकडले गेले नाहीत

Narendra Giri’s Suicide Note : आनंद गिरी यांच्यावर गंभीर आरोप, वाचा आणखी काय उल्लेख?

15 मे 2006 ला स्वामी अमृतानंद यांची हत्या झाली. त्यांची संपत्ती सरकारने ताब्यात घेतली

25 नोव्हेंबर 2006 ला बाल स्वामी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. तीन मारेकऱ्यांना अटक करण्यात आली.

8 फेब्रुवारी 2008 ला निरंजनी आखाड्याच्या सात साधूंना विष देण्यात आलं होतं. हे सगळे वाचले पण या प्रकरणात कुणालाही अटक झाली नाही

14 एप्रिल 2012 निर्वाणी अखाड्याचे सर्वोच्च पदस्थ असलेले महंत सुधीर गिरी यांची हत्या झाली

26 जून 2012 तीन संतांची हत्या करण्यात आली. उत्तराखंडमध्ये ही घटना घडली होती.

2014 मध्ये महानिर्वाणी आखाड्याचे प्रमुख महंत सुधीर गिरी यांची हत्या करण्यात आली. यामागे भू माफियांचा हात होता अशी शक्यता वर्तवण्यात आली होती.

12 ऑगस्ट 2018 ला अलीगढच्या पालीच्या मुकीमपूर ठाणा भागात असलेल्या शिव मंदिरात अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. या वेळी मंदिरात दोन पूजारी आणि तीन लोक झोपले होते. हल्लेखोरांनी यातल्या दोघांची दांडक्याने मारून मारून हत्या केली. तिसऱ्या माणूस मेला आहे असं समजून तिथून फरार झाले. या घटनेत ज्या दोघांचा मृत्यू झाला त्यापैकी एक 70 वर्षीय पूजारी होते.

14 सप्टेंबर 2018 अलीगढच्या हरदुआगंजच्या कलाई गावात दुरैनी आश्रमात अज्ञात हल्लेखोरांनी एका साधूची दंडुक्याने मारहाण करून हत्या केली.

28 एप्रिल 2020 बुलंदशहर मंदिर परिसरात झोपलेल्या दोन साधूंची धारदार शस्त्राने हत्या केली. जगनदास आणि सेवादास अशी या दोघांची नावं होती

1 सप्टेंबर 2020 उत्तर प्रदेशातील हरदोईल जिल्ह्यात तिहेरी हत्याकांड झालं होतं. एक साधू, एक साध्वी आणि साध्वीचा मुलगा अशा तिघांची काही अज्ञातांनी वीट, दगडाने ठेचून हत्या केली.

29 जून 2021 मेरठ मध्ये साधू चंद्रपाल यांचा मृतदेह सापडला होता. साधू चंद्रपाल हे बढला गावात वास्तव्य करत होते. काही लोकांनी त्यांची मारहाण करून हत्या केली.

आश्चर्याची बाब ही आहे की या सगळ्या हत्यांमागे संपत्ती हे प्रमुख कारण आहे. कुठे आश्रमाचं भांडण तर कुठे मठाच्या वर्चस्वाची लढाई यातून या साधू-संतांच्या हत्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातल्या पालघरमध्येही जुना आखाडाच्या दोन साधूंची तीन जणांनी मारहाण करून हत्या केली होती.

    follow whatsapp