Marathi news live : अर्थसंकल्पीय अधिवेशन, लोकसभा निवडणुकीसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोंडीबद्दल अपडेट राहण्यासाठी वाचा मुंबई तक लाईव्ह...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे २९३ अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर (Maharashtra Assembly Live)... पहा लाईव्ह...
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 07:54 PM • 01 Mar 2024'हा व्यक्ती मामुली गुंड नाही', वडेट्टीवारांनी शेअर केला शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओत तरुणाला लाठीने मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. मारहाण करणारा व्यक्ती आमदार संजय गायकवाड असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
वडेट्टीवार पोस्टमध्ये म्हणतात, "किती बोलायचं? किती प्रकरणं रोज दाखवायची? या व्हिडिओत तरुणाला अमानुष मारहाण करणारा व्यक्ती हा काही मामुली गुंड नाही. मारहाण करणारा व्यक्ती आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड. हवेत गोळीबार, एकमेकांवर गोळीबार, एकमेकांना लाथाभुक्क्या मारून सुरू असलेलं महायुतीच विकासच राजकारण आता जनतेला लाठ्या काठ्यानी झोडपून काढण्यापर्यंत पोहचलं आहे. असो... शेवटी हीच आहे मोदी की गॅरंटी!"
- 05:52 PM • 01 Mar 2024'मी शिवराळ भाषा वापरत नाही'- संजय राऊत
'मी कधीच शिवराळ भाषा वापरत नाही. मी असंसदीय शब्द वापरल्याचं दाखवा. मी त्याक्षणी पत्रकारिता आणि राजकारण सोडेल. मी शिवराळ भाषा वापरत नाही. भाजपवाले काय बोलतात ते सांगा,' असे संजय राऊत म्हणाले.
- 05:51 PM • 01 Mar 2024'या सरकरमध्ये सगळेच गुंड', कैलास गोरंट्याल यांचा टोला!
'या सरकारमध्येच सगळे नेते गुंड आहे, शेरोशायरितून ऊत्तर देतो की एक डाल पे बैठा ऊल्लू हर हाल पै बैठा ऊल्लू , अब अंजाम क्या होगा, असा टोला कैलास गोरंट्याल यांनी लगावला. हे लोकशाहीचं मंदिर आहे पण या मंदिरात नेते भिडतात जनतेला काय न्याय देणार, यांना यांचेच नेते न्याय देत नाहीत,' असा आरोप त्यांनी केला.
- 04:39 PM • 01 Mar 2024पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं -शिंदे
"राज्यात आणि देशात मोदी गॅरंटीवर विश्वास आहे. त्याचमुळे अजित पवारही आमच्यासोबत ज्वॉईन झाले आहेत सरकारमध्ये. अशोकराव आलेत. आणखी काय काय होईल. याची चिंता तुम्हाला आहे. त्यामुळे सकाळी आपल्यासोबत चहा प्यायला नेता, दुपारी आपल्यासोबत राहील की नाही, याची गॅरंटी नाही."
"आम्ही कुणालाही बोलवत नाही. निमंत्रण देत नाही. पण, मोदींच्या गॅरंटीमुळे लोक येत आहेत. विकासाच्या गाडीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. पण, विकासाचा अटल सेतु आम्ही पार केला. समृद्धीच्या महामार्गाने एक्स्प्रेस वे वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने आम्ही राज्याचा विकास केलाय आणि करतोय."
"आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. तुम्ही फक्त त्यांना पोकळ आश्वासने दिली. पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी स्थिती आहे."
- 04:20 PM • 01 Mar 2024एकनाथ शिंदे विरोधकांना म्हणाले...
"विरोधी पक्षाने दाखल केलेला २९३ प्रस्ताव जो आहे, तो प्रस्ताव मी वाचला. तुम्ही चहापानावर बहिष्कार टाकला होता, तो प्रस्तावही वाचला. गेल्या वेळी अंतिम आठवडा प्रस्ताव होता, तोही वाचला. एकच असतं ते... एकच स्क्रिप्ट... एकच ड्राफ्ट... सगळं एकच. आणि एकाच स्क्रिप्टवर एकच चित्रपट बनवता येतो ना. त्यामुळे यांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत."
"सरकार चुकत असेल, तर नक्की टिका करा. पण, मुद्दा नसेल, तर अपशब्द वापरायचे. आरोप करायचे. मुद्दा सोडून गुद्द्यावर यायचे. थयथयाट करायचा. पक्ष चोरला म्हणून... चिन्ह चोरलं म्हणून... हे रोज सुरू आहे. नवी राजकीय संस्कृती महाराष्ट्रात जन्माला येतेय. स्वार्थासाठी विचार विकलेल्यांनी अशा प्रकारे कांगावा करणे हे हास्यास्पद आहे. विचार विकले, भूमिका विकला, विचारधारा विकली. सत्तेसाठी सगळं केलं."
"सारखं चोरलं... चोरलं म्हणत रडायचं, ही कुठली भूमिका आहे. अरे मर्दासारखे बोला ना आणि जाहीरपणे बोला. आम्ही जे देतोय ते जाहीरपणे देतोय. शेतकरी, लोकांपर्यंत पोहोचवतो. आम्हाला खोके-खोके म्हणणारे... त्यांनी आमच्याच खात्यातून ५० कोटी घेतलेत. त्याचीच आता चौकशी सुरूये. शिवसेनेच्या खात्यातले. शिवसेना आमच्याकडे आहे... ते आता खोके पुरत नाही, म्हणून कंटेनर... हे मी नाही, कुणीतरी बोललं आहे."
"अर्थपूर्ण बोलण्यापेक्षा काही लोक निरर्थक बोलण्यात धन्यता मानतात. काही लोक सभागृहात न बोलता बाहेर मीडियात जास्त बोलण्यात आनंद समजतात. विधिमंडळाचे कामकाज घरी बसून फेसबुकवर लाईव्ह करता येत नाही, नाहीतर तेही केलं असतं."
"काहीजण आपली आमदारकी वाचवण्यासाठी सभागृहात हजेरी लावतात. तेही माहिती आहे. तुम लढो हम कपडे संभालते है, असे म्हणणारेही काही लोक आहेत. महाआघाडीची वज्रमूठ असल्याचे काही जण म्हणायचे. फोटो काढताना हातात हात आणि प्रत्यक्षात पायात पाय."
- 02:44 PM • 01 Mar 2024Sharad Pawar : शिंदे-फडणवीसांनी नाकारलं शरद पवारांचं आमंत्रण
बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यावेळी शरद पवारांनी तिन्ही पाहुण्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं होतं. यानंतर आता शिंदे-फडणवीसांनी पवारांचं हे आमंत्रण नाकारलं आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे आपण येऊ शकणार नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
- 02:33 PM • 01 Mar 2024विधानसभेत राम कदम यांचा ठाकरे-राऊतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव!
- 10 जानेवारीला शिवसेना आमदार प्रकरणाचा निर्णय आला.
- 11 जानेवारीला सामना अग्रलेखात 'अखेर चोरमंडळाला मान्यता', निर्णय विरोधात गेला तेव्हा अध्यक्षांविरोधात विरोधात अवमानकारक विधान केलं.
- अध्यक्षांचा असा उल्लेख हे लोकशाही, महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे. अध्यक्षांचा उल्लेख डोमकावळे असा केला.
- वारंवार अभद्र वाणीचा प्रयोग करत अध्यक्षांचा अवमान केला
- असा हक्कभंगाचा प्रस्ताव राम कदम यांनी ठाकरे आणि राऊत यांच्याविरोधात मांडला.
- 02:18 PM • 01 Mar 2024...तर संघ-भाजपसोबत जाईन - प्रकाश आंबेडकर
वंचित भाजपची बी टीम होत असल्याच्या आरोपांवर उत्तर देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'मला अधिकृत बायको होता येत असेल तर ठेवलेली बायको कशाला होऊ? मला ज्याच्याशी युती करायची असेल तर उघडपणे करेल. पुजारी हा विद्यापीठातून येईल असा कायदा केल्यास संघ-भाजपसोबत जायला मी तयार आहे,' असं ते म्हणाले.
- 02:16 PM • 01 Mar 2024पुणे महानगरपालिकेकडून शहरात अतिक्रमण विरोधी कारवाई
अवैध बांधकामाविरोधात आज सकाळपासून महानगरपालिकेची कारवाई सुरू झाली आहे. पाषाण विभागात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अतिक्रमण विरोधात कारवाई. आधी नोटीस देऊन देखील अतिक्रमण न काढणाऱ्यांवर महानगरपालिका कारवाई करत आहे
- 02:12 PM • 01 Mar 2024अजितदादा आणि फडणवीसांचं सरकार व्हाव अशी आमदारांची इच्छा - सुनील तटकरे
'लोकसभा महासंग्राम' कॉनक्लेव्हमध्ये सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अजितदादा आणि फडणवीसांचं सरकार व्हावं अशी आमदारांची इच्छा होती. सर्वांना 2024 च्या निवडणुकीची उत्सुकता आहे.' असं देखील तटकरे म्हणाले.
- 02:11 PM • 01 Mar 2024भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
भिवंडी मनपा मुख्यालयासमोर नागरिकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. नालेसफाईच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करीत परशुराम पाल असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. शहर पोलिसांनी आंदोलन करताना त्याला ताब्यात घेतले.
- 01:45 PM • 01 Mar 2024"महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे...", शेलारांचा आदित्य आणि उद्धव ठाकरेंवर 'वार'
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आहे. तोच धागा पकडून आशिष शेलार त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, "मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवार यांनी महाराष्ट्रात संघर्षातही महाराष्ट्राची प्रगल्भ राजकीय परंपरा जतन करणारे वातावरण निर्माण केले, म्हणूनच बारामतीतून भोजनाचे आमंत्रणाचे पत्र आलेय."
"याबाबत निर्णय काय होईल तो होईल पण, मनसेचे नेते राज ठाकरे हे सुद्धा वारंवार हे परंपरा जतन करीत आले आहेत. महाराष्ट्रातील जवळपास सगळी राजकीय घराणी ही परंपरा वर्षोनुवर्षे जतन करीत आली आहेत", असे मत त्यांनी मांडले.
पुढे आशिष शेलार म्हणतात की, "फक्त महाराष्ट्रात एक राजकीय बाप-बेटे आहेत, त्यांनी त्यांच्या घरची वडिलोपार्जित ही प्रथा परंपरा बंद करुन टाकली! त्यांचा नारा एकच, मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ! पेग, पेग्वीन, पार्टीसाठी कमला मिल बरी", असे म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना डिवचले आहे.
- 11:53 AM • 01 Mar 2024अजित पवारांचं बंड कुटुंबातील कुणालाच आवडलेलं नाहीये -युगेंद्र पवार
अजित पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी जाहीरपणे भाष्य केले. ते म्हणाले, "कुठल्याही पक्षात किंवा कुटुंबात फूट पडली तर लोकांना ते आवडत नाही. कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मलाही अजित पवारांचे बंड आवडलेलं नाही. असं काहीतरी होईल, असं मलाही कधाही वाटलं नव्हतं. कुटंबातील जवळपास सर्वच लोकांना हे आवडलेलं नाहीये. असं व्हायला नको होतं."
- 11:41 AM • 01 Mar 2024'ही राजकारणाला लागलेली वाळवी'; राऊतांची मोदी-फडणवीसांवर आगपाखड
संजय राऊत यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, "महा रोजगार मेळावा सरकारी योजना आहे, ती भाजपाची किंवा शिंदे गँगची योजना नाही. विद्यमान खासदार आणि आमदार हे सरकारी योजनांचा भाग असतात. तरीही सरकार शरद पवारांना बोलवत नाही? अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण हे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांनी सुरु केलं आहे. डर्टी पॉलिटिक्स अलिकडे सुरु झालं आहे."
"राज्यात हा कोणता खेळ चालला आहे? पैसे तुमच्या घरच्या झाडाला आलेत का? वर्षा बंगल्यावर, देवगिरी बंगल्यावर जी झाडं आहे, त्यांना खोके लागलेत का? तिथे जमिनीतून खोके उगवत आहेत का? मर्जीप्रमाणे कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार, खासदारांना निमंत्रण देत नाही हा कुठला प्रकार आहे? केंद्रात मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर, महानुभव सत्तेत आल्यापासून ही वाळवी सुसंस्कृत राजकारणाला लागली आहे", अशी टीका संजय राऊतांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT