LIVE Maharashtra Assembly Election Results: मुंबई: राजकीय घडामोडी घडत असतानाच आयपीएलचा मेगा ऑक्शन दोन दिवस सुरु राहणार आहे. आज 24 नोव्हेंबरला आयपीएल लिलावाचा पहिला दिवस आहे. लिलावाचं आयोजन सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये होत आहे. मेगा ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. जास्तीत जास्त 204 खेळाडूंचा लिलाव होऊ शकतो. हे आयपीएलचं 18 वं लिलाव आहे. याशिवाय प्रत्येक मतदारसंघातील निकाल आणि इतर सगळ्या घडामोडी Mumbaitak.in या आमच्या वेबसाइटवर तुम्हाला मिळतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान हे 20 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलं होतं. संपूर्ण राज्यात 66.05 टक्के एवढं मतदान झालं होतं. ज्यानंतर काल (23 नोव्हेंबर) या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालामध्ये महायुतीला तब्बल 233 जागा मिळाल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मात्र 49 जागा मिळाल्या. राज्याचे निकाल समोर आल्यानंतर आता सर्व लक्ष राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार यावर आहे. सोमवारी 25 नोव्हेंबरला किंवा 26 नोव्हेंबरला मुंबईमध्ये शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे.
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 06:42 PM • 24 Nov 2024IPL 2025 Mega Auction: 'या' खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांचा वर्षाव, सविस्तर लिस्ट वाचा
आयपीएलचा मेगा ऑक्शन दोन दिवस सुरु राहणार आहे. आज 24 नोव्हेंबरला आयपीएल लिलावाचा पहिला दिवस आहे. लिलावाचं आयोजन सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये होत आहे. मेगा ऑक्शनमध्ये एकूण 577 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. जास्तीत जास्त 204 खेळाडूंचा लिलाव होऊ शकतो. हे आयपीएलचं 18 वं लिलाव आहे. आयपीएल 2025 लिलावादरम्यान कोणत्या खेळाडूंवर कोट्यावधी रुपयांचा वर्षाव झाला आहे. याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
खरेदी केलेल्या खेळाडूंची लिस्ट
1. अर्शदीप सिंग (भारत) - 18 कोटी, पंजाब किंग्ज (बेस प्राईज- 2 कोटी)
2. कगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) - 10.75 कोटी (गुजरात टायटन्स), (बेस प्राईज 2 कोटी)
3. श्रेयस अय्यर (भारत) - 26.75 कोटी, पंजाब किंग्ज (बेस प्राईज - 2 कोटी)
4. जॉस बटलर (इंग्लंड) - 15.75 कोटी, गुजरात टायटन्स, (बेस प्राईज - 2 कोटी)
5. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) - 18.75 कोटी, दिल्ली कॅपिटल्स, (बेस प्राईज - 2 कोटी)
6. रिषभ पंत (भारत) - 27 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राईज- 2 कोटी)
7. मोहम्मद शमी (भारत) - 10 कोटी, सनरायजर्स हैदराबाद (बेस प्राईज 2 कोटी)
8. डेविड मिलर (दक्षिण आफ्रिका)- 7.5 कोटी, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राईज - 1.5 कोटी)
9. युजवेंद्र चहल (भारत) - 18 कोटी, पंजाब किंग्ज (बेस प्राईज - 2 कोटी)
10. मोहम्मद सिराज (भारत) - 12.25 कोटी, गुजरात टायटन्स (बेस प्राईज - 2 कोटी)
11. लियाम लिविंगस्टन (इंग्लंड) - 8.75 कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (बेस प्राईज - 2 कोटी)
12. के एल राहुल (भारत) - 14 कोटी, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राईज- 2 कोटी) - 03:32 PM • 24 Nov 2024Maharashtra Election 2024 LIVE : विजयानंतर पहिली प्रतिक्रिया भुजबळ म्हणाले, मनोज जरांगेंचं...
"आमचे मित्र मनोज जरांगेंचं निवडणुकीत काय काम होतं? प्रचार संपण्याच्या आधीच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत जरांगेंनी सगळं सांगितलं. मनोज जरांगे हाताला सलाईन लावून आले, आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा म्हणाले. माझ्या मताधिक्क्यावर त्याचा परिणाम झाला, पण इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समाज एकवटल्यामुळे आमचा विजय झाला. शरद पवारांनीही माझ्याविरोधात उमेदवार देताना चांगला अभ्यास केला होता" असं म्हणत छगन भुजबळ यांनी दोघांनाही टोला मारला.
- 03:28 PM • 24 Nov 2024Maharashtra Election 2024 LIVE : आमच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा
आमच्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा आहे अशा शब्दात छगन भुजबळ यांनी आभार मानले आहेत. बहिणींमुळे घराचतल्या पुरुषांनाही खात्री पटली की, सरकार जे बोलणार आहे ते करणार आहे. महिलांचं मतदानही यंदा जास्त झालं आहे. महिला जेव्हा मतदान करतात, तेव्हा पुरूषही आपोआप मतदान करतात असं भुजबळ म्हणालेत.
- 01:42 PM • 24 Nov 2024Maharashtra Election 2024 LIVE : नांदेड जिल्ह्यातही महाविकास आघाडीला मोठा धक्का
राज्यासह नांदेड जिल्ह्यातही महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभेच्या नऊच्या नऊ जागेवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यात भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गटाचे तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका उमेदवाराचा समावेश आहे. तर लोकसभा पोट निवडणुकीत काँग्रेसने गड राखला. एकीकडे भाजपाला पराभव पत्कराव लागला. नऊ विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा जिल्ह्यात सुपडा साफ झाला आहे.
- 11:40 AM • 24 Nov 2024Maharashtra Election 2024 LIVE : Manoj Jarange : मराठा आरक्षण द्या, अन्यथा सरकारच्या छाताडावर बसणार
मराठा आरक्षण न दिल्यास तुम्हाला गुडग्यावर आणणार असं म्हणत मनोज जरांगे यांनी इशारा दिला आहे. आलेल्या सरकारचं अभिनंदन करतो, पण आता सरकारने मराठा आरक्षण द्यावं लागेल. आरक्षण मिळालं नाही तर आम्ही छाताडावर बसून आरक्षण घेऊ. उद्या शपथविधी झाल्यानंतर आम्ही आमच्या उपोषणाचाही तारीख जाहीर करु असं जरांगे म्हणालेत.
- 11:07 AM • 24 Nov 2024Maharashtra Election 2024 LIVE : राहुल कुल यांच्या समर्थकाचा विजयाचा जल्लोष करताना मृत्यू
राज्यात काल जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. राज्यात महायुतीचे तब्बल 233 आमदार आले आहेत. त्यामध्ये दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल यांचाही समावेश आहे. राहुल कुल यांच्या विजयानंतर दौंडमध्ये तुफान जल्लोष करण्यात आला. यावेळी बाळासाहेब भोसले यांनी तुफान जल्लोष केला. यादरम्यानच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
- 10:35 AM • 24 Nov 2024चंद्रचूड यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहीलं जाणार : राऊत
देशाच्या सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेशी संबंधी निर्णय लवकर द्यायला हवा होता. अडीच वर्ष तुम्ही निर्णय देत नसाल तर तुम्ही खुर्च्या कशाला उबवता आहात? असा सवाल करत संजय राऊत यांनी निकालानंतर प्रतिक्रिया दिली. धनंजय चंद्रचूड हे बाहेर उत्तम प्रोफेसर किंवा भाषणं देण्यासाठी चांगले आहेत, पण सरन्यायाधीश म्हणून घटनात्मक पेचावर त्यांनी योग्य निर्णय दिला नाही. हा निर्णय दिला असता तर हे चित्र दिलं नसतं. याबद्दल इतिहास त्यांना माफ करणार नाही. पक्षांतरासाठीच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवून ते गेलेत. दहाव्या शेड्यूलची भीतीच आता राहिली नाही. ती भीती न्यायमुर्तींनीच घालवली. या सर्व गोष्टींना जस्टीस चंद्रचूड जबाबदार आहेत, त्यांचं नाव काळ्याकुट्ट अक्षरात लिहीलं जाईल असं संजय राऊत म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT