Maharashtra Bandh Photo: कोणत्या शहरात कसं सुरु आहे ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलन?

मुंबई तक

• 06:06 AM • 11 Oct 2021

मुंबई: महाराष्ट्र बंदचा आता हळूहळू परिणाम जाणवू लागला आहे. या बंदमध्ये मुंबईतील बेस्ट बसच्या संघटना देखील सहभागी झाल्या आहेत. ठाणे: शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, ठाणे बाजारपेठेतील सुरु असलेली दुकान बंद करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र कल्याण-डोंबिवली: महाराष्ट्र बंद आंदोलनाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीत देखील पहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक संघटनांनी कल्याण-डोंबिवलीत निदर्शने सुरु केली आहेत. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मुंबई: महाराष्ट्र बंदचा आता हळूहळू परिणाम जाणवू लागला आहे. या बंदमध्ये मुंबईतील बेस्ट बसच्या संघटना देखील सहभागी झाल्या आहेत.

ठाणे: शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, ठाणे बाजारपेठेतील सुरु असलेली दुकान बंद करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र

कल्याण-डोंबिवली: महाराष्ट्र बंद आंदोलनाचे पडसाद आता कल्याण-डोंबिवलीत देखील पहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक संघटनांनी कल्याण-डोंबिवलीत निदर्शने सुरु केली आहेत.

पालघर: बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, पालघर शहरात कडकडीत बंद, बाजार पेठ, भाजी मार्केट, मासळी मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती ही पूर्णपणे बंद आहे.

बारामती: बारामती शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे.

कोल्हापूर: शिवसेना कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील NH-4 पुणे-बंगळुरु हायवेवर चक्का जाम आंदोलन केलं असून यावेळी वाहतूक रोखून धरली आहे.

सोलापूर: सोलापूरमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचे चित्र सध्या दिसतं आहे. कारण सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये सर्व बाजार सध्या सुरळीत असून मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे आजही गर्दी दिसून येत आहे.

नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी यार्ड देखील आज पूर्णपणे बंद असून येथील व्यापारी वर्गाने या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे.

नागपूर: नागपूरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले असून महाराष्ट्र बंद आंदोलनाला सुरवात केली आहे. यावेळी शिवसैनिकांनी काही दुकाने जबरदस्तीने बंद करायला लावली आहेत.

नाशिक: नाशिक जिल्ह्यात मुख्य 16 ही बाजार समितीचे कामकाज बंद, शहरात मात्र बंदला संमिश्र प्रतिसाद

अकोला: अकोल्यात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी बाईक रॅली काढून भाजप सरकारचा निषेध नोंदवत आहेत.

    follow whatsapp