गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई तक

• 01:49 PM • 25 Mar 2021

आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना राज्यातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आलंय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा […]

Mumbaitak
follow google news

आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना राज्यातील मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. गायिका आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आलंय. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आशा भोसले यांना 2020 या वर्षीचा महाराष्ट्र पुरस्कार देण्याचं निश्चित झालंय.

हे वाचलं का?

गेल्या अनेक दशकांपासून आशा भोसले यांच्या गाण्याने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांमध्ये आशा भोसले यांनी गायन केलं आहे. आशा भोसले यांच्या आवाजामुळे हिंदी तसंच मराठी गीतांना एक उंची मिळाली आहे. सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.

आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याचं सर्वांकडून अभिनंदन करण्यात येतंय. संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवारांनी हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आशा भोसले यांना शुभेच्छा दिल्यात. तर आशा भोसले यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आभार मानले आहेत.

    follow whatsapp