लाइव्ह

Marathi News Live Update : कोट्यवधी राम भक्तांचे स्वप्न नरेंद्र मोदींमुळे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचा गौरव

मुंबई तक

25 Dec 2023 (अपडेटेड: 26 Dec 2023, 02:29 AM)

Maharashtra Politics Latest News : महाराष्ट्रातील राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत. त्यातच एका ओपिनियन पोलच्या आकड्यांनी सत्ताधारी महायुतीची चिंता वाढवली आहे. तर दोन पक्षात झालेल्या मोठ्या बंडाळीमुळे खिळखिळ्या झालेल्या महाविकास आघाडीला बळ दिलंय… त्यामुळे या पोलवर राजकीय प्रतिक्रिया उमटणार आहेत… त्याबद्दलचे अपडेट्स आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक घटनांची माहिती जाणून घेण्यासाठी वाचा मुंबई Tak लाईव्ह अपडेट्स…

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 09:58 PM • 25 Dec 2023
    Marathi News Live Update : कोट्यवधी राम भक्तांचे स्वप्न नरेंद्र मोदींमुळे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधानांचा गौरव
    देशातील कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न होते की, अयोध्येत राम मंदिर उभारावे. त्याच प्रमाणे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेही तेच स्वप्न होते. तेच स्वप्न आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. राम मंदिराचा लोकार्पण सोहळ्याचेही आता देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
  • 09:23 PM • 25 Dec 2023
    Marathi News Live Update : मराठा आरक्षणासाठी अंबाजोगाईमध्ये युवकाची आत्महत्या, तालुक्यातील ही दुसरी घटना
    मराठा समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने निराश झालेल्या 35 वर्षीय तरुणाने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अंबाजोगाई तालुक्यातील ही दुसरी घटना असल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश काकासाहेब जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्या आंदोलनात आकाश जाधव सक्रिय होता, मात्र आता आरक्षण मिळाले नसल्याने तो निराश झाला होता. या घटनेची नोंद बर्दापूर पोलिसात झाली आहे.
  • 09:00 PM • 25 Dec 2023
    Marathi News Live Update : भाव पडल्याने शेतकऱ्याने कापूस रस्त्यावर फेकला, व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांचा उद्रेक
    अमरावतीमधील दरियापूरमध्ये कापसाचे भाव घसरल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. यावेळी शेतकऱ्याने ट्रॅक्टरमधील कापूस रस्त्यावर फेकून देत कापसाला सध्याचा भाव मिळावा अशी मागणी केली. कापूस व्यापाऱ्यांनी भाव पाडल्यामुळे शेतकऱ्यांच्या निविष्ठाचा खर्च भरून निघत नसल्याचे सांगत कापूस रस्त्यावर फेकून देण्यात आला. सरकारने ठरवून दिलेल्या भावापेक्षा कमी भावाने व्यापारी शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करत असल्याने बाजारात भाव कोसळले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
  • 06:15 PM • 25 Dec 2023
    C Voter Survay : लोकसभेत मविआ 28 जागा जिंकणार, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
    एबीपीच्या सी व्होटर सर्व्हेत महायुती 19 ते 21 आणि महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. आता या सर्व्हेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक सर्वेचा सन्मान करतो. पण ए वोटर असो, बी वोटर असो, सी,डी, ई किंवा झेड वोटर असो. पण हे लक्षात ठेवा, देशात फक्त मोदीजींची हवा आहे. जनतेने ठरवून टाकलंय मोदीजींनाच मत द्यायचंय. त्यामुळे लोकसभेत आम्ही 40 च्या पार जाणार म्हणजे जाणारच, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.
  • 03:23 PM • 25 Dec 2023
    केदारांची आमदारकी रद्द, जितेंद्र आव्हाडांनी भाजपवर डागली टीकेची तोफ
    "केंद्राची कीड आता राज्यालाही लागली आहे. भाजप सरकारला निलंबनाचा रोग झालाय. विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचं सरळ मार्गाने काही वाकडं करता येत नाही म्हणून मिळेल त्या संधीचा वापर करून आमदार, खासदारांवर त्यांनी कारवाईचा सपाटा लावलाय. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे सहकारी सुनील केदारजी यांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करण्याची संधी न देता त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची सरकारला इतकी घाई का लागली आहे? केदार यांनी नागपुरात भाजपची चांगलीच कोंडी करून ठेवली होती, त्याचा वचपा काढण्याचा हा डाव आहे", असे म्हणत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.
  • 01:42 PM • 25 Dec 2023
    राऊतांना म्हणाले, पत्रकार पोपटलाल, ठाकरेंना काय दिला सल्ला?
    'मंबाजी-तुंबाजी आणि कमळाबाई', या मथळ्याखालील सामनात लिहिलेल्या अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले. ठाकरेंकडून करण्यात आलेल्या टीकेला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी चिमटे काढत प्रत्युत्तर दिलं आहे. शेलारांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात त्यांनी पत्रकार पोपटलाल म्हणत राऊतांनाही टोमणा मारला आहे.
  • 12:20 PM • 25 Dec 2023
    शरद पवार 38 व्या वर्षी मुख्यमंत्री झाले तेव्हा... दादांच्या टीकेवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
    mumbaitak
  • 11:11 AM • 25 Dec 2023
    प्रकाश आंबेडकरांचा स्वबळाचा नारा, संजय राऊत म्हणाले...
    प्रकाश आंबेडकरांनी 48 जागांवर स्वतंत्र लढण्याचा इशारा दिला आहे. त्याबद्दल राऊत म्हणाले, "बघा, बाळासाहेब आंबेडकरांसोबत आमची चर्चा सुरू आहे. बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्या भूमिकेत फरक नाहीये. बाळासाहेब आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्याच मार्गाने जाणारे त्यांचे नातू आहेत. या देशात संविधान टिकावं, लोकशाहीची हत्या होऊ नये, कायदा पायदळी तुडवला जाऊ नये, या देशातील मोदींची हुकुमशाही लोकशाही मार्गाने संपवावी, असे मानणारे बाळासाहेब आंबेडकर आहेत. आमच्यासोबतच्या चर्चेत ते सकारात्मक आहेत आणि ती चालू आहे. मला असं वाटतं की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते लवकरच एकत्र बसणार आहोत. 28 तारखेनंतर ही निर्णायक बैठक होणार आहे. प्रकाश आंबेडकर आंबेडकर असा कोणताही निर्णय घेणार नाहीत, ज्याच्यामुळे हुकुमशाहीचे हात बळकट होतील", असे संजय राऊत यांनी सांगितले.
  • 10:21 AM • 25 Dec 2023
    अदानींविरोधात सगळे बोलतात, पण आम्ही मोर्चा काढला -संजय राऊत
    "उद्धव ठाकरेंना देशभरात मान्यता आहे. पूर्ण देशात ठाकरे कुटुंब असो वा उद्धव ठाकरे, हे या देशातील हुकुमशाही विरोधात लढणारे लोक आहेत. उद्योगपती अदानींविरोधात सगळे बोलतात, पण आम्ही मोर्चा काढला. अदानी म्हणजे मोदी हे आपल्याला माहितीये. आम्ही रस्त्यावर उतरू. राहुल गांधींनंतर देशात एक नेता असा आहे, जो रस्त्यावर उतरून लढाई लढतोय, ते उद्धव ठाकरे आहेत. इंडिया आघाडीचे नेते उद्धव ठाकरेंना मानतात. त्यांचा आदर करतात", असे संजय राऊत म्हणाले.
  • 09:42 AM • 25 Dec 2023
    प्रकाश आंबेडकरांची स्वबळाची तयारी
    इंडिया आघाडीत जाण्याची इच्छा व्यक्त करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं. 'पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र ही राज्य लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. इतर राज्यात काय करता येईल माहीत नाही. पण महाराष्ट्रात बरंच काही करता येईल. मात्र विरोधक एकत्र येतील अशी परिस्थिती वाटत नाही. एकत्र येणार नसतील तर 48 जागा ताकदीने लढवू. तुम्हाला आता कठोर निर्णय घ्यावे लागतील. उद्या एकत्र येणार नसाल तर आम्ही सर्वांनी 48 च्या 48 जागा स्वबळावर लढवल्या पाहिजे. त्याही ताकदीने लढवल्या पाहिजे", असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.
  • 09:27 AM • 25 Dec 2023
    महाराष्ट्रातील मतदारांच्या मनात काय, पहिल्या ओपिनियन पोलचा कौल काय?
    एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊनही भाजपचं महाराष्ट्रात टेन्शन कमी होताना दिसत नाहीये. महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडी मुसंडी मारेल, असे अंदाज एका ओपिनियन पोलमधून समोर आले आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजप प्रणित एनडीएपेक्षा महाविकास आघाडीला चार टक्के जास्त मते मिळणार असल्याचा निष्कर्ष यातून समोर आला आहे.
follow whatsapp