लाइव्ह
Marathi News Live : “तुम्ही भर चौकात होऊ शकता नागवे”, राऊतांना शेलारांनी सुनावलं
मुंबई तक
03 Jan 2024 (अपडेटेड: 04 Jan 2024, 03:28 AM)
Maharashtra Breaking news Live updates : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इंडिया आघाडीचा जागा वाटपाच्या फॉर्म्युला ठरला असल्याचे सांगितले जात असले, तरी त्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. दुसरीकडे महायुतीमध्येही लोकसभा मतदारसंघावर तिन्ही पक्षांतील नेत्यांकडून दावे केले जाऊ लागले आहेत. जागा वाटपाबद्दल दोन्ही आघाड्यांमधील घटनांचे अपडेट्स वाचा लाईव्ह…
महाराष्ट्रातील सर्व जिल्हे आणि महत्त्वाच्या शहरांतील घटना घटना घडामोडींची ताजी माहिती एकाच ठिकाणी जाणून घेण्यासाठी वाचत रहा लाईव्ह अपडेट्स…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 04:56 PM • 03 Jan 2024आम्हाला बोलायला लावू नका..., शेलारांचा इशारासंजय राऊतांनी लालकृष्ण आडवाणी आणि अटलबिहारी वाजपेयी यांचं बाबरी मशीद पाडल्यानंतरच काय मत होतं, याबद्दलचा व्हिडीओ ट्विट केला. त्याला आता आशिष शेलारांनी उत्तर दिले.शेलारांनी ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात, "श्रीमान संजय राऊत... अहंकार, विस्मरण असे आजार आपल्याला झालेत. कारण विशाल ह्रदयाच्या हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान, विचार, पक्ष आणि राजकीय वारसदार आदी सगळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिवसैनिकांकडे आहेच.""ते रामाला मानतात आणि पंरपराही जोपासतात. त्यामुळे प्रश्न हा उरतोच की, शिल्लक राहिलेल्या तुमच्या सारख्या कोत्या मनाच्या उबाठा गटाचा राम मंदिराशी संबंध काय? मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी काँग्रेस, शरद पवार आणि समाजवादीशी हात मिळवणी केलीत ना?", असा सवाल शेलारांनी राऊतांना केला आहे. शेलार पुढे म्हणतात," एकदा तुमचे हात स्वच्छ पाण्यात बुडवून पहा... कोठारी बंधूचे रक्त स्पष्ट तुम्हाला दिसेल! म्हणून लक्षात ठेवा... बघा आम्हाला बोलायला लावू नका... बरेच शिल्लक आहेत आमच्याकडे अस्सल डोस भगवे, तुम्ही भर चौकात होऊ शकता हं नागवे", असे प्रत्युत्तर शेलारांनी राऊतांना दिले.
- 01:32 PM • 03 Jan 2024नितीश कुमार होणार इंडिया आघाडीचे समन्वयक?विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीला लवकरच समन्वयक मिळू शकतो. ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्यावरून नितीश कुमार यांच्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत काँग्रेसने पुढाकार घेतला आहे. काँग्रेस हायकमांडने याबाबत जेडीयू प्रमुख नितीश कुमार आणि आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा केली आहे.
- 01:19 PM • 03 Jan 2024अयोध्येत 6 डिसेंबरला जे घडलं ते खूप दुर्दैवी; काय म्हणालेले वाजपेयी? राऊतांनी शेअर केला व्हिडीओफडणवीस, महाजन आणि शेलार यांचा उल्लेख करत संजय राऊतांनी उत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील श्रीमान फडणवीस, श्रीमान गिरीश महाजन, श्रीमान आशिष शेलार वैगरे वैगरे... तथाकथित राम भक्तांसाठी 'ही' स्मरण गोळी" Memory tablets. उगाळून घ्या... आणखी देखील जालीम डोस आहेत. योग्य वेळी देऊच", असे म्हणत संजय राऊतांनी व्हिडीओ शेअर केला आहे.
- 11:54 AM • 03 Jan 2024मनोज जरांगेंची टीका, छगन भुजबळांना संताप अनावरमनोज जरांगे यांच्याकडून झालेल्या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळांना संताप अनावर झाला. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं. त्याचबरोबर त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
- 11:16 AM • 03 Jan 2024लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनिती'येत्या काळात आम्ही ताकदीने लढू. राज्यात 45 पेक्षा जास्त जागा जिंकू. मराठा समाज असेल, 12 बलुतेदार असतील, ओबीसी बांधव असतील, असा संपूर्ण महाराष्ट्र महायुतीच्या पाठिशी आहे. आम्ही जिंकू याचा विश्वास आहे", असे सांगताना महायुतीतील तीन पक्षाच्या नेत्यांनी मिशन लोकसभा 2024 चा पुढील काळातील कार्यक्रम जाहीर केला.
- 09:24 AM • 03 Jan 2024शरद पवारांची सभा आटोपून परतताना आठ ते दहा जणांनी केला हल्लाशरद पवार यांची मंगळवारी आश्वी येथे सभा झाली. या कार्यक्रमाहून परत येत असताना कॉंग्रेसचे शिर्डीचे अध्यक्ष सचिन चौगुले आणि शिर्डीतील माजी नगरसेवक सुरेश आरणे यांच्यावर लोणी येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. सात ते आठ हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT