लाइव्ह
Marathi Live News: रामलल्ला तुमची मालकी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल
मुंबई तक
24 Dec 2023 (अपडेटेड: 25 Dec 2023, 03:58 AM)
Breaking news of Maharashtra in marathi : अनेक मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. मराठा आरक्षणापासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत राजकीय घडमोंडींना वेग आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर राजकीय आणि गुन्हेगारीविषय घडामोडी घडाताहेत… याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचत रहा मुंबई Tak लाईव्ह अपडेट्स…
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 10:06 PM • 24 Dec 2023मुंबई जळत असताना बाळासाहेब अनेकांच्या पाठीशी, उद्धव ठाकरेंनी जुन्या आठवणी जागवल्याज्यावेळी मुंबई हिंदू-मुस्लिम वादामुळे जळत होती, त्यावेळी सत्ता नसतानाही हिंदुहृदयसम्राट आणि शिवसैनिक अनेक लोकांच्या पाठीशी उभा राहिले. त्यामुळे आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की, मराठी माणूस आणि उत्तर भारतीय हे साखरेसारखे गोड राहिले असले तरी त्यामध्ये काही जण मीठ टाकण्याचं काम करत असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
- 09:03 PM • 24 Dec 2023Marathi Live News: रामलल्ला तुमची मालकी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवालअयोध्येत राममंदिर उभारंल जातं आहे हे गौरवाची गोष्ट असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी केंद्रात आमची सत्ता येणार आणि नक्कीच सत्ता येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या काळात हिंदू म्हणून सांगायला लोकं घाबरायची मात्र त्यावेळी बाळासाहेब ठाकरे उभा राहिले असं सांगत उत्तर भारतीय आणि मराठी माणूस हा साखरेसारखा मिसळला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी रामलल्ला ही तुमची मालकी आहे का असा सवालही त्यांनी भाजपला केला आहे.
- 08:43 PM • 24 Dec 2023पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दागिने गहाळ झाले नाहीत, मंदिर समितीचे स्पष्टीकरणपंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या 2021-22 मधील लेखा परीक्षण अहवालामध्ये कोणत्या ही प्रकारचे दागिने गहाळ झाले नसल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. याबाबत मंदिराच्या सोने चांदी दागिन्यांविषयीही सूचना करण्यात आल्या आहेत. शासनाच्या मूल्यांकनकारांच्या नियमानुसार दागदागिण्यांची नोंद ताळेबंदला घेण्याचीही मंदिर समितीने दक्षता घेतली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- 06:29 PM • 24 Dec 2023आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारला भीषण अपघातकोल्हापूरात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या ताफ्यातील कारचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र तानाजी सावंत आणि त्यांचे स्वीय सहाय्यक किरकोळ जखमी झाले आहेत. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावर राजपूत वाडी येथे हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
- 06:22 PM • 24 Dec 2023राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे कोरोना पॉझिटीव्हmumbaitak
- 03:49 PM • 24 Dec 2023ते (भुजबळ) बधीर झालंय- मनोज जरांगेछगन भुजबळांनी मनोज जरांगेंना डबल डबल भाषण करू नका, तब्येत सांभाळा असा सल्ला दिला. त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "तू नको सल्ले देऊ म्हणा मला, गप्प बस. ते कामातून गेलंय पूर्ण. त्याचं स्वप्न होतं की, मराठे ओबीसीमध्ये येऊ नये. आणि नेमकं 54 लाख मराठे ओबीसी आरक्षणात आले. ते झालंय बधीर. त्याला काहीच सूचेना. आता काही दिवसांनी ते कागदच खातंय. कागद खाल्ल्याशिवाय ते राहत नाही आता. ते पूर्णपणे बावचळून गेलं आहे. त्याला काही किंमत द्यायची नाही, असं ठरवलं आहे." संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- 03:38 PM • 24 Dec 2023मराठे करोडोच्या संख्येने मुंबईत धडकणार -जरांगेचा इशारा"अंतरवालीतून पायी मुंबईकडे निघणार आहोत. 26 जानेवारीपर्यंत आम्ही मुंबईत जाऊ. त्याची तयारी सुरू झाली आहे. 20 दिवसांत शेतीतील सगळी काम आवरू. नियोजबद्ध काम आम्हाला करावं लागणार आहे. दहा लाख गाड्या सोबत येण्याची शक्यता आहे. तीन कोटी मराठा सहभागी होण्याची शक्यता आहे. मी माझ्या शब्दावर ठाम असतो आणि उपोषण होणार. मराठे करोडोच्या संख्येने मुंबईत धडकणार. मराठे किती ताकदीने धडकणार हे सरकारला कळेल", असा इशारा मनोज जरांगे पाटील म्हणाले.
- 03:09 PM • 24 Dec 2023भाजपला एवढी घाई का झालीये?, नाना पटोलेेंचा सवाल"सुनील केदारांच्या प्रकरणात त्यांना अपील करण्याची संधी आहे. आज रविवारी आहे. भाजपला एवढी काय घाई झाली होती? भाजपमध्ये असेल, तर गुजरातच्या वॉशिंग मशीनमध्ये धुतल्या जातात. भाजप आमदार, खासदारांवर कारवाई का होत नाही?", असा सवाल करत "भाजपकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे", अशी टीका नाना पटोले यांनी केली.
- 02:15 PM • 24 Dec 2023माजी मंत्री सुनील केदारांची आमदारकी रद्दकाँग्रेसचे विदर्भातील महत्त्वाचे नेते सुनील केदार यांना जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर काँग्रेसला आणखी झटका बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाने याबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
- 01:03 PM • 24 Dec 2023मनोज जरांगेंचा नवा इशारा, देवेंद्र फडणवीसांनी मांडली भूमिकामनोज जरांगे यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की सरकार सकारात्मकतेनं काम करत आहेत. मुख्यमंत्री हे स्वतः यात लक्ष घालून आहे. राज्य मागासवर्ग आयोग वेगाने काम करतोय. शिंदे समितीचा दुसरा अहवाला आला. तिसरा अहवाल प्रतिक्षेत आहे. राज्य सरकारची सकारात्मकता बघता त्यांनी अशा प्रकारचा निर्णय घेऊ नये. राज्य सरकार योग्य काम करतंय, हे लक्षात आल्यानंतर तसा निर्णय ते घेणार नाही. आम्ही पूर्ण शक्तीने हे सगळं करतो आहोत. कुठेही ओबीसी समाजाला त्रास आणि अन्याय होणार नाही, याची काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कार्यवाही सरकार करत आहे", असे देवेंद्र फडणवीस जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्यावर म्हणाले.
- 12:25 PM • 24 Dec 2023फेब्रुवारीत मराठा आरक्षण कायदा करणार -मनोज जरांगेंनी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याचसंदर्भात बोलताना कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. पण, आज मी सांगू इच्छितो की, त्यांच्यावर उपोषणाला बसायची वेळ येणार नाही. मुंबईत येण्याची वेळच येणार नाही. कारण मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आलं आहे."
- 10:18 AM • 24 Dec 2023मुंबईत अनेक वर्षांची अस्वच्छता, ती स्वच्छता करायची -एकनाथ शिंदेमनोज जरांगेंनी मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याचसंदर्भात बोलताना कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन म्हणाले, "मनोज जरांगे पाटलांनी 20 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे. पण, आज मी सांगू इच्छितो की, त्यांच्यावर उपोषणाला बसायची वेळ येणार नाही. मुंबईत येण्याची वेळच येणार नाही. कारण मराठा आरक्षण अंतिम टप्प्यात आलं आहे."
- 10:12 AM • 24 Dec 2023ते पूर्ण पागल झालं आहे, जरांगेंनी पुन्हा भुजबळांना केलं लक्ष्य"ते (छगन भुजबळ) पागल झालं आहे. त्याला काय करावं तेच कळेना. मराठे ओबीसीत येऊ नये, असे त्याला (छगन भुजबळ) वाटते, पण नेमके 54 लाख मराठे ओबीसीत येऊन बसले आहेत. आता आठ-दहा दिवसांत अडीच कोटींपेक्षा जास्त मराठे ओबीसी आरक्षणात जातील. त्या आधारावर. त्याचा (छगन भुजबळ) प्रॉब्लेम उलटा होऊन बसला आहे. खोटं रेटून बोलायची सवय असल्यामुळे ते (भुजबळ) पूर्ण आरबळून (गोंधळून) गेलं आहे. त्याला (भुजबळ) काय करावं ते कळेना. मला त्याला इथून पुढे महत्त्व सुद्धा द्यायचं नाही. ते पूर्ण पागल झालं आहे", अशा शब्दात मनोज जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर टीकास्त्र डांगलं आहे.
- 09:30 AM • 24 Dec 2023काँग्रेसने बदलले प्रभारी, महाराष्ट्र चेन्नीथलांकडे...आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील नेते माणिकराव ठाकरे यांच्याकडे काँग्रेसने गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेलीच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT