लाइव्ह

Rahul Gandhi : सुनील केदारांचा रुग्णालयातील मुक्काम संपला, कारागृहात होणार रवानगी

मुंबई तक

28 Dec 2023 (अपडेटेड: 29 Dec 2023, 02:30 AM)

Maharashtra Politics latest News : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीची लगबग सुरू झाली आहे. राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. काँग्रेसचा स्थापना दिवस महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये होतोय. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ‘हैं तैयार हम’, कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांचे नेते एकमेकांविरुद्ध दंड थोपटताना दिसत आहे. या सगळ्यांबद्दलच्या प्रतिक्रिया आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी वाचा मुंबई तक लाईव्ह अपडेटस्

राहुल गांधी यांचं संपूर्ण भाषण

Mumbaitak
follow google news

लाइव्हब्लॉग बंद

  • 10:44 PM • 28 Dec 2023
    सुनील केदारांचा रुग्णालयातील मुक्काम संपला, कारागृहात होणार रवानगी
    माजी मंत्री सुनील केदार यांचा हॉस्पिटलमधील मुक्कामा संपला आज संपला असून आता त्यांची कारागृहात रवानगी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुनील केदार यांना रुग्णालयातील डॉक्टरांनी आज तपासून त्यांचे आरोग्य चांगले असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांना आता रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. 22 डिसेंबर रोजी नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने माजी मंत्री सुनील केदार यांना 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
  • 10:39 PM • 28 Dec 2023
    प्रश्न मांडणं अभिनय वाटत असेल तर अंतर्मुख व्हायला हवं-खासदार अमोल कोल्हे
    उगाच पदावर बसल्यानंतर विकासाचा अभिनय करण्यापेक्षा केंद्रातल्या सरकारकडे मान वर करुन सवाल विचारता येत नाही म्हणून त्यांची लाचारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्यावर येवुन मांडणं जास्त महत्वाचे असल्याचे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. कांदा, दुध, वीज, हे प्रश्न मांडतोय आणि हा जर अभिनय असेल तर मंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला हवा असा टोलाही त्यांनी अजित पवार गटातील नेत्यांना लगावला आहे.
  • 09:28 PM • 28 Dec 2023
    देशाची वाटचाल संविधान आणि एकात्मतेवर- खासदार सुप्रिया सुळे
    काँग्रेसकडून आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत दोन्ही पक्षामध्ये फूट पडल्याचे सांगितले होते. त्यावरूनच आता महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. ही दोन्ही पक्ष फुटल्याचे सांगत काँग्रेसच महाराष्ट्रात महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे म्हटले होते. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही चर्चा इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल त्यावेळी यावर चर्चा होऊन सर्व प्रश्न सुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या देशाची वाटचाल एकात्मतेने आणि संविधानवर होत असून एकला चलो रे यावर देशाची वाटचाल होत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  • 07:58 PM • 28 Dec 2023
    आमदार अपात्रतेचा निकाल ठाकरे गटाच्याच बाजूने-आमदार राजन साळवी
    आमदार अपात्रतेच्या मुद्यावर बोलताना राजापूर मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांनी हा निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि न्यायदेवतेवर विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • 05:09 PM • 28 Dec 2023
    आमच्या पक्षात गुलामी चालते, भाजप खासदारांने राहुल गांधींना काय सांगितलं?
    काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी यांनी एका खासदारासोबतचा संवाद सागत भाजपत गुलामी चालते, अशा शब्दात हल्ला चढवला.
  • 02:48 PM • 28 Dec 2023
    शरद पवार यांनी घेतलेल्या पुढाकाराचे आम्ही कौतुक करतो -वंचित बहुजन आघाडी
    19 डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठकी दिल्लीत पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रित करण्याचा मुद्दा शरद पवारांनी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांना सांगितले. तसेच वंचितने पाठवलेल्या पत्राला उत्तर देण्याची विनंती केली. शरद पवारांनी घेतलेल्या पुढाकाराचे वंचितकडून कौतुक करण्यात आले आहे.
  • 12:58 PM • 28 Dec 2023
    राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (28 डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत बाळा नांदगावकर होते.
  • 12:29 PM • 28 Dec 2023
    अजित पवारांनी वाटल्या गाड्या, अंजली दमानियाचा उपस्तित केले प्रश्न
    राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना गाड्या वाटण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी 40 बोलेरो आणि 40 स्कॉर्पिओ गाड्या वाटण्यात आल्या. हे पदाधिकाऱ्यांना इलेक्शनसाठी गिफ्ट असल्याचे म्हटले जात आहे.
  • 10:54 AM • 28 Dec 2023
    अंतरवाली सराटी ते मुंबई... मराठा आंदोलन दिंडीचा असा आहे मार्ग
    मनोज जरांगे यांनी सांगितलं की, अंतरवाली ते मुंबई पायी दिंडी जाणार आहे. आंतरवालीवरून 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता दिंडी निघेल. अंतरवालीनंतर शहागड, गेवराई, पाडळशी, मांदळमोरी, तांदळा-मातुरी-खरवंडी, पाथर्डी, तिसगाव, करंजी, अहमदनगर, केडगाव, सुपा, शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव, वाघोली, खराडी बायपास, चंदननगर, शिवाजीनगर, पुणे, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर मार्गे जाऊन आझाद मैदान आणि दादरमधील शिवाजी पार्कवर दाखल होणार आहे. या दिंडी मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, असं आवाहन जरांगेंनी केलं आहे.
  • 10:19 AM • 28 Dec 2023
    काँग्रेस RSS च्या अंगणातून फुंकणार निवडणुकीचे रणशिंग
    लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या काँग्रेसचा 139 वा स्थापना दिवस गुरुवारी (28 डिसेंबर) साजरा होत आहे. यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात हैं तैयार हम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करत काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे.
  • 10:01 AM • 28 Dec 2023
    बच्चू कडूंनी शरद पवारांना का दिलं चहापानाचं निमंत्रण?
    शरद पवार-बच्चू कडू यांच्या भेटीची चर्चा आहे. राजकीय वर्तुळात या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पवारांना बच्चू कडूंनी घरी बोलावलं. यामागच्या कारणाचाही त्यांनी खुलासा केला. "१० वर्षांपूर्वी विदर्भ मिल बंद पडली आणि फिनले मिलचा विस्तार इतर ठिकाणी होणार होता. तेव्हा शरद पवार कृषीमंत्री होते. मी आणि आर. आर. आबा त्यांना भेटायला गेलो. तेव्हा शंकरसिंह वस्त्रोद्योग मंत्री होते. त्यांच्याशी शरद पवारांनी चर्चा केल्यामुळे ती मिल आपल्याला अचलपुरात सुरू करता आली. त्याची जाणीव म्हणून आम्ही शरद पवारांना आमंत्रण दिलं. त्यामुळे ते घरी चहापानासाठी येणार आहेत", असे बच्चू कडू म्हणाले.
  • 10:01 AM • 28 Dec 2023
    अमोल कोल्हेंना चॅलेंज, जयंत पाटलांचं अजित पवारांना प्रत्युत्तर
    mumbaitak
follow whatsapp