Maharashtra Breaking News Live : इंडिया आघाडीसाठी ठाकरे-केजरीवाल भेटले, ममता बॅनर्जींबरोबरही चर्चा
मुंबई तक
18 Dec 2023 (अपडेटेड: 19 Dec 2023, 03:18 AM)
Maharashtra news live updates : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आणि चर्चाही केली मात्र, जरांगेंनी वेळ वाढवून देण्यास नकार दिलाय. त्यामुळे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी पातळीसोडून टीका केलीये. त्यामुळे भुजबळ-जरांगे वाद विकोपाला गेला आहे. दोन्ही नेते आणि मराठा आरक्षणासंदर्भात आज काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
Mla Disqualification case Maharashtra : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दोन्ही गटातील नेत्यांची उलटतपासणी पूर्ण झाली असून, आजपासून युक्तिवाद सुरू होणार आहे. दोन्ही गटांना दीड दिवसांचा कालावधी बाजू मांडण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. सुरुवातीला ठाकरे गट बाजू मांडणार आहे. सुनावणीतील सर्व अपडेट तुम्ही इथे बघू शकताृ…
हिवाळी अधिवेशनात काय सुरूये… त्याचबरोबर राज्यात काय घडतंय… या सगळ्यांचे अपडेट वाचण्यासाठी मुंबई तकच्या लाईव्ह अपडेट्स वाचत रहा….
विधानसभेतील कामकाज पाहण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
ADVERTISEMENT
- 09:59 PM • 18 Dec 2023Marathi News Live Update : इंडिया आघाडीसाठी ठाकरे-केजरीवाल भेटले, ममता बॅनर्जींबरोबरही चर्चाइंडिया आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी आणि ईडीच्या नोटीस दुसऱ्यांदा मिळाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीत इंडिया आघाडीबरोबरच अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीसवरूनही चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून ही दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे.
- 07:19 PM • 18 Dec 2023Marathi News Live Update : केजरीवाल-ठाकरे थोड्याच वेळात भेटणार, दिल्लीत महत्वाच्या विषयांवर होणार चर्चामहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल थोड्याच वेळात एकमेकांची भेट घेणार आहेत. ठाकरे आणि केजरीवाल यांची ही भेट दिल्लीतील केजरीवाल यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीबरोबरच ईडीकडून देण्यात आलेल्या नोटीसांवर यावेळी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही ईडीकडून नोटीस मिळाल्याचे सांगण्यात आले.
- 06:59 PM • 18 Dec 2023Marathi News Live Update : नववधूने लग्नादिवशीच गळफास घेऊन केली आत्महत्या, सोलापूरमधील धक्कादायक घटनासोलापूर शहर परिसरात नववधूने लग्नादिवशीच राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सालेहा महिबूब शेख असं नववधूचे नाव आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून प्रियकराने मित्रांना सोबत घेत मानसिक त्रास दिला असल्याचे नववधूच्या वडिलांनी सांगितले. प्रियकराने मित्रांना सोबत घेत सालेहाचे लग्न मोडण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी नववधू सालेहा शेख हिने विजापूर नाका पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यामध्ये एकतर्फी प्रेमातून त्रास दिला असल्याची तक्रार करण्यात आली होती.
- 06:25 PM • 18 Dec 2023Marathi News Live Update : ठाकरे गटाची अवस्था घर का ना घाट का- मंत्री गिरीश महाजन यांची टीका'सलीम कुत्ता हा बाँम्बस्फोटातील सर्वात मोठा सुत्रधार आहे. तो नगरसेवक बडगुजर यांच्यासोबत तिकडे नाचत आहे. आमच्यावर आक्षेप घेतला जातोय. पण, ठाकरे गटाची अवस्था 'घर का ना घाट का' झाली आहे.' अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
- 06:07 PM • 18 Dec 2023Marathi News Live Update : CM शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा, वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मिळणार लाभ'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना 18 हजार 762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. पण सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी झाली. त्यामुळे 6 लाख 56 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले होते. या 6 लाख 56 हजार वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा आज मी इथे करतो.' अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.
- 04:59 PM • 18 Dec 2023हे संकटमोचक सरकार -एकनाथ शिंदेशेतकरी अडचणीत असताना आम्ही कधीही घरात बसून राहिलो नाही... प्रत्येक वेळी बांधावर जाऊन आम्ही परिस्थिती समजून घेतली.. आणि त्यांना लगोलग मदतही केली.. अधिवेशनाच्या काळातही अवकाळी पाऊस झालेल्या भागात आम्ही दोघांनी दौरा केला... शेतकऱ्यांसाठी हे सरकार संकटमोचक म्हणून काम करत आहे. यंदाही काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकरी हैराण झालाय... राज्यात सरासरीच्या ९० टक्के असमान पाऊस झाल्यामुळे पाण्याचं संकट निर्माण झालंय... दुष्काळ जाहीर करण्यात राज्य सरकारने दिरंगाई केली, असा आरोप झाला... तुमच्या माहितीसाठी सांगतो की, केंद्राच्या पथकाने नुकतीच आपण दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या तालुक्यांना भेटी देऊन पाहाणी केली, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
- 04:57 PM • 18 Dec 2023शेतकऱ्यांना सरकारकडून कोट्यवधींची मदत -एकनाथ शिंदेशेतकऱ्यांबद्दल आपल्या सगळ्यांना काळजी आहे, मग सत्ताधारी असो वा विरोधक. 44 हजार 278 कोटींची मदत आमच्या सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना सरकारकडे मदत मागावी लागू नये, अशी परिस्थिती निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. आम्ही काही मोठं केलं असं म्हणण्याचं कारण नाही. सत्ता आल्यानंतर दीड वर्षात आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
- 04:57 PM • 18 Dec 2023आम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली नाही -शिंदेजेव्हा अडीच वर्ष सत्तेत होते. त्यामुळे आरोप करताना आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे. गेल्या सरकारच्या तुलनेत कितीतरी जास्त मदत आम्ही दिली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आम्ही केलेलं नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकारला टोला लगावला.
- 04:57 PM • 18 Dec 2023मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर विधानसभेतून टीकेचे बाणमाझं कुटुंब माझी जबाबदारी असं म्हणून फक्त केवळ घरी बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका आम्ही घेतल्या नाहीत. आम्ही बांधावर गेलो. शेतकऱ्यांशी बोललो. सूचना देत बसलो नाही, असा चिमटा एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना लगावला.
- 04:37 PM • 18 Dec 2023महाराष्ट्रात किती कुणबी नोंदी; शिंदे समितीच्या दुसऱ्या अहवालात काय?सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीने 4 महिन्यात 15 कोटी 92 लाख प्रमाणपत्र आतापर्यंत तपासली आहेत. यात मराठवाड्यातील 2 कोटी 1 लाख जात प्रमाणपत्रांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 54 लाख 81 हजार कुणबी पुरावे न्या. शिंदे समितीच्या हाती लागले आहेत. त्यात 25 हजार नोंदी या मराठवाड्यातील आहेत. विशेष म्हणजे सरकारने आतापर्यंत 40 हजार कुणबी प्रमाणपत्र नागरिकांना सुपूर्द केली असून, त्यात 1 हजार 454 मराठवाड्यातील नोंदी आहेत. लाखो कुणबी प्रमाणपत्र आढळल्याची माहिती शिंदे समितीच्या दुसर्या अहवालात प्रसिद्ध होणार आहे. मराठा समितीचा दुसरा अहवाल स्वीकारला जाणार आहे. संध्याकाळी उपसमितीच्या बैठकीत मांडला जाणार आहे.
- 04:28 PM • 18 Dec 2023भुजबळांनी जिवंत समाधी घ्यावी -मनोज जरांगे"ते (भुजबळ) अपघातानं झालेलं आहे, असे मंत्री नसतात. गोरगरिबांचा वापर स्वतःचा स्वार्थासाठी करायचा. नेता म्हणून मिरावयाचं. स्वतःचा राजकीय स्वार्थ साधायचा, असा हा माणूस त्यामुळे गोरगरीब ओबीसी बांधवांच्या लक्षात आलंय की याच्या राजकीय स्वार्थासाठी आपण भांडणे करायची नाही. त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. त्याने चॅलेंज करण एवढं सोप्प नाही, पण तरी मी पुन्हा चॅलेंज करतो. जन्म झाल्यापासून आतापर्यंत माझी नार्को टेस्ट करा, दारूचा थेंब जरी निघाला तरी इथंच जिवंत समाधी घेईल नाहीतर त्यांनी घ्यावी जिवंत समाधी," असे आव्हान जरांगे पाटलांनी छगन भुजबळांना दिलं.
- 03:29 PM • 18 Dec 2023गिरीश महाजन यांच्यावरील आरोप खोट, फडणवीसांनी विधान परिषदेत काय सांगितलं?दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित सलीम कुत्ता यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो एकनाथ खडसे यांनी परिषदेत दाखवला. एका विवाह सोहळ्यात पालकमंत्री आणि काही आमदार उपस्थित होते, असा दावा खडसेंनी केला. यावरून सभागृहात गदारोळ सुरू होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. "ज्या लग्नात गिरीश महाजन गेले होते, ते लग्न मुस्लीम धर्माचे नाशिकचे शेर ए खातीम यांच्या पुतण्याचं होतं. त्यासाठी ते गेले होते. त्यांचा दाऊद सोबत कोणताही सबंध नाही. ज्या परिवारात लग्न झालं, त्यांचा देखील कुठंही दाऊद सोबत संबंध नाही. ज्यावेळी हे आरोप 2018 साली गिरीश महाजन यांच्यावर झाले, त्यावेळी डीसीपींची समिती नेमली होती. त्यामधे स्पष्ट करण्यात आलं की दाऊद सोबत त्याचा काही संबंध नाही. केवळ उद्धव ठाकरे आज सभागृहात आले. त्यामुळं यांनी आज गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. गिरीश महाजन यांच्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आहेत."
- 01:56 PM • 18 Dec 2023अनिल परब आणि शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वादअंबादास दानवे म्हणाले, "सदस्य बाजू कोणाची घेतायेत, हा प्रश्न आहे. 2017 मे मध्ये नाशिकमध्ये लग्न झालं. इक्बाल कासकर, त्यांचे नातेवाईक, सून, लग्न हा खासगी विषय आहे, पण त्यात आयबीचे लोक होते. सलीम कुत्ता मेलेला आहे असं एका आमदाराने सांगितलं आहे. परंतु मंत्रिमंडळातील एक मंत्री, विधानसभेतील सदस्य कार्यक्रमाला जातात. यात स्पष्ट गिरीश महाजन यांचं नाव दिसत आहे." त्यानंतर निलम गोऱ्हे म्हणाल्या, "कोणाची नावं घेऊ नका. मी रेकॉर्डवरून नाव काढते. तुम्हाला नवाब मालिकांच्या मुद्द्याचा वचपा काढायचा आहे बाकी काही नाही."
- 01:53 PM • 18 Dec 2023विधानपरिषदेत ठाकरेंच्या उपस्थितीत सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार गदारोळदेशद्रोही दाऊद इब्राहिम यांच्याशी संबंधित सलीम कुत्ता यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो एकनाथ खडसे यांनी परिषदेत दाखवला. एका विवाह सोहळ्यात पालकमंत्री आणि काही आमदार उपस्थित होते, असा खडसेंचा दावा. याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी खडसेंनी केली. सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाई होते, तर मग महाजन यांच्यावर का नाही. एक मंत्री कसा काय बसू शकतो? असे खडसे म्हणाले. यावरून सत्ताधारी मंत्री शंभुराज देसाई यांनी आक्षेप घेतला.
- 12:45 PM • 18 Dec 2023...नाहीतर भुजबळ पागल होईल; महाजनांचं नाव घेत जरांगेंचं प्रत्युत्तरछगन भुजबळांना उत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले, "त्याला (भुजबळ) काय काम आहे. आता ते गिरीश महाजनांनी सांगितलं म्हणून आम्ही गप्प बसलो होतो. तो बोलणार नाही म्हणे आता म्हणून आम्ही पण बोललो नाही. 2दिवस गप्प बसलं आणि केलं त्यांनी परत चालू. मग मी गप्प बसणार नाही. महाजनांनी त्याला येरवड्याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गोळ्या द्याव्या, नाही तर तो पागल होईल. त्याला 2/3गोळ्या देणं खूप गरजेचं आहे. त्याला गोळ्याची आवश्यकता आहे आता; नाही तर ते टकुऱ्यावर (डोक्यावर) चालू शकतं. ते बधीर झालं आहे, ते त्या लायकीचंच नाही राहिलं", असा पलटवार जरांगे यांनी भुजबळांवर केला. खडसे म्हणाले, "सदर प्रकरणात आरोप झाल्यानंतर मीडियात आल्यानंतर चौकशीला बगल घेण्यासाठी पत्रिका छापल्या. आमंत्रणामुळे लग्नाला गेलो असं ते म्हणाले. जसं सुधाकर बडगुजर यांच्यावर तात्काळ कारवाईसाठी कार्यवाही झाली तशी यावरही व्हावी."
- 12:12 PM • 18 Dec 2023राज ठाकरेंना टोला, संजय राऊत काय बोलले?महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, "देश आणि लोकशाही वाचवण्याची ही वेळ आहे. अशावेळी सर्व मतभेद विसरून आपण सर्वांनी एकत्र यावं आणि लोकशाहीचे रक्षण करावे, या मताचे आम्ही आहोत. भाजपची सरकारे ही फोडा, झोडा आणि राज्य करा या पद्धतीची आहेत. निदान महाराष्ट्रातील नेत्यांनी तरी शहाणपणाने वागावे, अशी आमची भूमिका आहे", असे म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला.
- 12:01 PM • 18 Dec 2023उल्हासनगरमध्ये मद्यधुंद चालकाने वाहनांना उडवले, 3 जणांचा मृत्यूUlhasnagar News : रिक्षा आणि कारच्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वायूवेगाने येणाऱ्या कारने रिक्षा आणि दुचाकींना उडवले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. हा अपघात कल्याण-बदलापूर रोडवर सकाळी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अपघातस्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या पोलीस कारचालकाचा शोध घेत आहेत. याप्रकरणी सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
- 11:03 AM • 18 Dec 2023चौधरींची नियुक्ती कायदेशीर, हे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय -कामतकामत - हे अगदी स्पष्ट आहे की, विधिमंडळ गटनेत्याची नियुक्ती राजकीय पक्षाकडूनच केली जाते. अजय चौधरी यांची उपाध्यक्षांनी केलेली नियुक्ती ही कायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. मग उपाध्यक्ष या नियुक्तीला स्थगिती कशी देऊ शकतात? निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर जाणारा प्रथमदर्शनी उद्दिष्टे आणि राजकीय पक्षाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाची रचना कोणती आहे. राजकीय नेतृत्वाने कृतीमुळे राजकीय नेतृत्वाचा संघर्ष असावा. त्यावेळची नेतृत्व रचना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला पूर्ण पाठिंबा देते, हे खरे आहे. प्रथमदर्शनी ट्रिपल टेस्ट इंडिकेशन करावे लागेल. टॉम, डिक आणि हॅरी सारखे नाही... कोणीही म्हणावे की, मी पक्षाचा अध्यक्ष आहे.
- 10:42 AM • 18 Dec 2023ठाकरेंकडून नियुक्ती, त्याचा शिंदेंनी घेतला फायदा; प्रश्न उपस्थित करत ठाकरेंच्या वकिलांचा युक्तिवादकामत - तुम्हाला जर उद्धव ठाकरे आवडत नव्हते, तर तुम्ही राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा किंवा निवडणूक आयोगाकडे ऑर्डर का आणली नाही. आणि नंतर सरकार का बदललं नाही? पण या प्रकरणात हे केलं गेलं नाही. एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून नियुक्ती उद्धव ठाकरेंकडून करण्यात आली होती. त्यांनी त्याचाच फायदा घेतला. तुम्ही अस्तित्वात असलेल्या पक्षाची स्थितीच बदलून टाकली आहे. हे 10 परिच्छेदाचं उल्लंघन आहे.
- 10:28 AM • 18 Dec 2023आमची स्वतंत्र पार्टी आहे, असं 10 लोक ठरवू शकत नाही -कामतकामत - भरत गोगावले यांची नियुक्ती बहुसंख्य आमदारांनी केली. हे 21 जून रोजी घडलं. तेव्हा निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डमध्ये केवळ एकच पक्ष होता. अचानक 10 लोक असा निर्णय घेऊ शकत नाही की, आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि आमची स्वतंत्र ओळख आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT