मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांना (Farmer) 3 लाखांपर्यंतचं पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) केली होती. आत त्याच घोषणेची अंमलबजावणी देखील होणार आहे. कारण या अत्यंत महत्वपूर्ण निर्णयाला आज (10 जून) राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet) बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मंत्रिमंडळाने या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यामुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज हे शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. ज्याचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
Maharashtra@61 : कोरोनाशी लढण्याचा संकल्प करून नवा महाराष्ट्र घडवू-बाबा आढाव
2021-22 साठी राज्याचा जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावेळी याबाबतची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. मागील वर्षभरापासून कोरोना संकट सतत घोंघावत आहे. अशावेळी कृषी क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी राज्य सरकारने शून्य टक्के व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा दृष्टीने हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.
ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत घेतलेल्या कर्जाची परतफेड ही वेळेत केली आहे अशा शेतकऱ्यांना आता 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Budget : शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा
पाहा अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार कृषी क्षेत्र आणि पिक कर्ज यावर काय म्हणाले होते:
‘राज्यात कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात कृषी क्षेत्राने म्हणजेच शेतकऱ्यांनी महाराष्ट्राला सावरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी सरकारकडून प्रयत्न केले जाणार आहेत. 31 लाख 23 हजार शेतकऱ्यांना 19 हजार 929 कोटींचं कर्ज थेट वर्ग करण्यात आलं.’
‘शेतकऱ्यांना सुलभरित्या कर्ज उपलब्ध करून देण्यात आलं. यंदा 42 हजार कोटींचं पीक कर्जाचं वाटप करण्यात येईल. असंही अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. एवढंच नाही तर शून्य टक्के व्याज दरावर 3 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.’
‘2020-21 मध्ये उद्योग व सेवा क्षेत्रात घट झाली असतनाही कृषी व संलग्न कार्यक्षेत्रात 11.7 टक्के इतकी भरीव वाढ झाली होती. कठीण काळात राज्याच्या कृषी क्षेत्रानेच सावरलं होतं. या बळीराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्यांच्या उप्तन्नात वाढ भरीव वाढ व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत.’ असंही अजित पवार म्हणाले होते.
ADVERTISEMENT