महाराष्ट्राची राजधानी मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाट नियंत्रणात येत असली, तरी राज्याच्या काही भागांत मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात राज्यात २४ हजार ९४८ नवीन रुग्णांची नोंद झाली. महत्त्वाचं म्हणजे राज्यात मागील काही महिन्यानंतर प्रथमच १०३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
ADVERTISEMENT
राज्याच्या आरोग्य विभागाकडून कोरोना आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, राज्यातील काही शहरात अजूनही मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात आज २४,९४८ रुग्ण आढळून आले असले, तरी बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. दिवसभरात ४५,६४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात ७२,४२,६४९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठी असून, १०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर १.८६ टक्के इतका असून, रिकव्हरी रेट ९४.६१ टक्के इतका आहे. आजपर्यंत राज्यात ७,४१,६३,८५८ नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. यापैकी ७६,५५,५५४ म्हणजेच १०.३२ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
राज्यात ‘या’ ठिकाणी आढळले एक हजारपेक्षा जास्त रुग्ण
पुणे महापालिका – ३,३७७
नागपूर महापालिका – २,१६१
पिंपरी चिंचवड महापालिका – २,०९९
नाशिक महापालिका – १,७२०
पुणे ग्रामीण – १,४५२
मुंबई महापालिका – १,३१२
नागपूर ग्रामीण – १,०७५
सध्या राज्यात १४,६१,३७० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३ हजार २०० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या २,६६,५८६ इतकी आहे.
११० नवीन ओमिक्रॉन रुग्णांची नोंद
राज्यात ओमिक्रॉन ११० ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने या सर्व रुग्णांची नोंद केली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?
मुंबई महापालिका – 1010
ठाणे जिल्हा – 00
ठाणे महापालिका – 51
नवी मुंबई महापालिका – 13
कल्याण डोंबिवली महापालिका – 11
उल्हासनगर महापालिका – 03
भिंवडी निजामपूर महापालिका – 05
मीरा भाईंदर महापालिका – 52
पालघर जिल्हा – 00
वसई विरार महापालिका – 07
रायगड जिल्हा – 02
पनवेल महापालिका – 18
नाशिक जिल्हा – 05
नाशिक महापालिका – 00
मालेगाव महापालिका – 00
अहमदनगर जिल्हा – 04
अहमदनगर महापालिका – 00
धुळे जिल्हा – 00
धुळे महापालिका – 00
जळगाव जिल्हा – 02
जळगाव महापालिका – 00
नंदूरबार जिल्हा – 02
पुणे जिल्हा – 62
पुणे महापालिका – 1,185
पिंपरी चिंचवड महापालिका – 122
सोलापूर जिल्हा – 10
सोलापूर महापालिका – 00
सातारा जिल्हा – 15
कोल्हापूर जिल्हा – 19
कोल्हापूर महापालिका – 00
सांगली जिल्हा – 59
सांगली मिरज कुपवाड महापालिका – 00
सिंधुदुर्ग जिल्हा – 00
रत्नागिरी जिल्हा – 00
औरंगाबाद जिल्हा – 20
औरंगाबाद महापालिका – 00
जालना जिल्हा – 03
हिंगोली जिल्हा – 00
परभणी जिल्हा – 03
परभणी महापालिका – 00
लातूर जिल्हा – 03
लातूर महापालिका – 00
उस्मानाबाद जिल्हा – 11
बीड जिल्हा – 01
नांदेड जिल्हा – 03
नांदेड महापालिका – 00
अकोला जिल्हा – 11
अकोला महापालिका – 00
अमरावती जिल्हा – 32
अमरावती महापालिका – 00
यवतमाळ जिल्हा – 01
बुलढाणा जिल्हा – 06
वाशिम जिल्हा – 00
नागपूर जिल्हा – 225
नागपूर महापालिका – 00
वर्धा जिल्हा – 15
भंडारा जिल्हा – 03
गोंदिया जिल्हा – 03
चंद्रपूर जिल्हा – 00
चंद्रपूर महापालिका – 00
गडचिरोली जिल्हा – 02
बाहेरील राज्यांतील – 01
राज्यातील एकूण रुग्ण – 3,040
ADVERTISEMENT