राज्यावरील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं संकट कायम असून, आज दिवसभरात ३५ हजार ७५६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९४.१५ टक्क्यांवर पोहोचला असून, दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
ADVERTISEMENT
राज्यातील कोरोना परिस्थितीची आकडेवारी आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यात आज दिवसभरात ३९,८५७ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या राज्यातील रुग्णांची संख्या ७१,६०,२९३ इतकी झाली आहे.
Mumbai Covid Update : मुंबईत २४ तासांत आढळले १८०० पेक्षा अधिक रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनामुळे ७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूदर सध्या १.८७ टक्के इतका आहे. आजपर्यंत राज्यात ७,३८,६७,३८५ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यापैकी ७६,०५,१८१ म्हणजेच १०.३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
राज्यात सध्या १५,४७,६४३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३,२९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या २,९८,७३३ इतकी आहे.
दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज एकही ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या कायम आहे.
Corona Test नंतर रिपोर्ट निगेटिव्ह असला तर कोणता कोरोना झालाय?
कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?
मुंबई महापालिका – 1010
ठाणे जिल्हा – 00
ठाणे महापालिका – 51
नवी मुंबई महापालिका – 13
कल्याण डोंबिवली महापालिका – 11
उल्हासनगर महापालिका – 03
भिंवडी निजामपूर महापालिका – 05
मीरा भाईंदर महापालिका – 52
पालघर जिल्हा – 00
वसई विरार महापालिका – 07
रायगड जिल्हा – 02
पनवेल महापालिका – 18
नाशिक जिल्हा – 05
नाशिक महापालिका – 00
मालेगाव महापालिका – 00
अहमदनगर जिल्हा – 04
अहमदनगर महापालिका – 00
धुळे जिल्हा – 00
धुळे महापालिका – 00
जळगाव जिल्हा – 02
जळगाव महापालिका – 00
नंदूरबार जिल्हा – 02
पुणे जिल्हा – 62
पुणे महापालिका – 1,042
पिंपरी चिंचवड महापालिका – 122
सोलापूर जिल्हा – 10
सोलापूर महापालिका – 00
सातारा जिल्हा – 15
कोल्हापूर जिल्हा – 19
कोल्हापूर महापालिका – 00
सांगली जिल्हा – 59
सांगली मिरज कुपवाड महापालिका – 00
सिंधुदुर्ग जिल्हा – 00
रत्नागिरी जिल्हा – 00
औरंगाबाद जिल्हा – 20
औरंगाबाद महापालिका – 00
जालना जिल्हा – 03
हिंगोली जिल्हा – 00
परभणी जिल्हा – 03
परभणी महापालिका – 00
लातूर जिल्हा – 03
लातूर महापालिका – 00
उस्मानाबाद जिल्हा – 11
बीड जिल्हा – 01
नांदेड जिल्हा – 03
नांदेड महापालिका – 00
अकोला जिल्हा – 11
अकोला महापालिका – 00
अमरावती जिल्हा – 32
अमरावती महापालिका – 00
यवतमाळ जिल्हा – 01
बुलढाणा जिल्हा – 06
वाशिम जिल्हा – 00
नागपूर जिल्हा – 225
नागपूर महापालिका – 00
वर्धा जिल्हा – 15
भंडारा जिल्हा – 03
गोंदिया जिल्हा – 03
चंद्रपूर जिल्हा – 00
चंद्रपूर महापालिका – 00
गडचिरोली जिल्हा – 02
बाहेरील राज्यांतील – 01
राज्यातील एकूण रुग्ण – 2,858
ADVERTISEMENT