Maharashtra crisis: राहुल नार्वेकरांच्या भूमिकेवर बोट, कोर्टात काय घडलं?

मुंबई तक

• 02:26 AM • 14 Feb 2023

Maharashtra political crisis Latest News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असून, पाच सदस्यीय घटनापीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाने (Thackeray) नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा उपस्थित केला. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil Sibbal) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब […]

Mumbaitak
follow google news

Maharashtra political crisis Latest News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु असून, पाच सदस्यीय घटनापीठासमोर झालेल्या सुनावणी दरम्यान ठाकरे गटाने (Thackeray) नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narvekar) यांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा उपस्थित केला. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (kapil Sibbal) यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावर विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांनी त्यांची बाब स्पष्ट केली.

हे वाचलं का?

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा यांचा समावेश असलेल्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी झाली.

ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला, तर शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे यांनी केला. विधानसभा अध्यक्षांच्या वतीने एन.के. कौल यांनी बाजू मांडली.

एकनाथ शिंदेंसह बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या कार्यपद्धतीचा मुद्दा मांडला. सिब्बल म्हणाले की, “या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेलेला नाहीये. तरीही आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात कोणताही निर्णय 8 महिने होऊनही घेण्यात आलेला नाही. अपात्रतेची कारवाई करण्याच्या आमच्या याचिकेवर नव्या विधानसभा अध्यक्षांनी नोटीसही दिली नाही,” असं सिब्बल म्हणाले.

LIVE VIDEO: Eknath Shinde की Uddhav Thackeray, कोण जिंकणार? सत्ता संघर्षाची सुनावणी सुरु

“नवं सरकार हे ज्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलं आहे, त्यांच्या पाठिंब्यावर आहे”, असंही सिब्बल म्हणाले.

त्यावर एन. के. कौल म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षांनी आमदारांना नोटीस बजावली नाही, कारण हे प्रकरण न्यायालयासमोर आहे. या प्रकरणात चुकीचं सांगितलं जात आहे.”

यावर बोलताना सिब्बल म्हणाले, “त्यांनी (विधानसभा अध्यक्ष) फक्त आमच्या आमदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्या (शिंदे गट) आमदारांना नोटिसा पाठवल्या नाहीत”, असं म्हणत सिब्बल यांनी राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवरच हरकत घेतली.

Sanjay Raut: “फडणवीसांनी उपचार करून घेतले पाहिजेत”, मोदी-शाहांनाही डिवचलं

कपिल सिब्बल असंही म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणे काम करत असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात संसदेनं काहीतरी करायला हवं. जेव्हा तुम्ही घटनात्मक पदावर बसलेले असता तेव्हा तुमच्याकडून निष्पक्षपातीपणे काम करणं अपेक्षित असतं”, असा मुद्दा सिब्बल यांनी मांडला.

    follow whatsapp