पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश ही दोन्ही राज्यं कोरोना संवेदनशील असल्याचं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमधून येणाऱ्या नागरिकांना RTPCR चाचणी केल्याशिवाय महाराष्ट्रात प्रवेश करता येणार नाही. तसंच या आधी जी सहा राज्यं कोरोना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत त्यांच्यासाठी असलेले नियमच या दोन राज्यांसाठीही लागू करण्यात आले आहेत असंही सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केलं आहे.
ADVERTISEMENT
Break The Chain चे निर्बंध लादल्याने कोरोना महाराष्ट्रात रूग्णसंख्या स्थिरावली-मुख्यमंत्री
महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे. रेल्वे सेवा सुरू आहे, त्यामुळे परराज्यांमधून महाराष्ट्रात नागरिक येऊ शकतात. त्यामुळे कोरोना वाढण्याची चिन्हं आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने आता उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांना संवेदनशील राज्यांच्या यादीत टाकलं आहे.
Corona रोखण्यात आलेलं अपयश काही राज्यं आमच्या माथी मारत आहेत-डॉ. हर्षवर्धन
याआधी महाराष्ट्र सरकारने कोणती राज्य संवेदनशील म्हणून जाहीर केली आहेत?
केरळ
गोवा
राजस्थान
गुजरात
दिल्ली
उत्तराखंड
या सहा राज्यांचा कोव्हिड संवेदनशील राज्यांमध्ये समावेश होता या राज्यांमध्ये आता दोन आणखी राज्यांची भर पडली आहे. या सहा राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगाल किंवा उत्तर प्रदेशातून कुणी येत असेल तर प्रवाशांना 48 तास आधी RTPCR चाचणी करावी लागेल. कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच महाराष्ट्रात प्रवेश मिळू शकणार आहे. या दोन्ही राज्यांमधून जे प्रवासी येणार आहेत त्यांची रेल्वेची तिकिटंही आरक्षित असणं महत्त्वाचं आहे. सरकारने जारी केलेल्या या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटलं आहे की, ‘हा आदेश जारी करण्यात आलेल्या तारखेपासून ही राज्यं संवेदनशील मानली जातील जोवर हा आदेश मागे घेतला जात नाही तोवर हा आदेश कायम राहील.’
संतापजनक घटना… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले 22 कोरोना रुग्णांचे मृतदेह
राज्य सरकारने रेल्वे प्रवाशांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीतील काही महत्त्वाचे मुद्दे:
सर्व प्रवाशांना संपूर्ण प्रवासात आणि रेल्वे स्थानकात मास्क घालणं अनिवार्य असणार आहे.
रेल्वे प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरेजचं आहे.
सर्व स्थानकांवरील प्रवेश / निर्गमनाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनर असणं गरजेचं आहे.
प्रवाशांनी ट्रेन सुटण्याच्या वेळेपूर्वी स्टेशनवर यावं. जेणेकरून एन्ट्री पॉइंट्सवर थर्मल स्कॅनिंगसाठी गर्दी होणार नाही.
ई-तिकिट/मोबाइल तिकिट याचं अधिकाधिक प्रमोशन करणं गरजेचं आहे. कारण मोबाइल नंबरमुळे एखाद्या प्रवाशाचं ट्रेसिंग करणं सोपं जाईल.
महाराष्टात येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे 48 तास आधी करण्यात आलेल्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणं गरजेचं आहे.
संवेदनशील भागातून येणाऱ्या प्रवाशांना आरक्षित तिकिटाशिवाय महाराष्ट्रात प्रवासाला परवानगी नसेल
प्रत्येक प्रवाशाची यावेळी तपासणी केली जाईल. आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्यांची सुद्धा चाचणी केली जाईल. किमान थर्मल स्क्रिनिंग तरी केलंच जाईल.
दरम्यान, ट्रेनने महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांच्या हातावर होम क्वॉरंटाइनचा शिक्का मारण्यात यावा. ज्यांना पुढचे १५ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या आणि स्टेशनवर अँटजेन घेतलेल्या प्रवाश्यांसाठी देखील हा नियम लागू असणार आहे.
जर हातावर होम क्वारंटाईन असा शिक्का असलेला व्यक्ती त्या 15 दिवसांमध्ये बाहेर फिरताना आढळून आला तर त्याला 1000 रुपये दंड ठोठावण्यात येईल. तसंच त्याला क्वारंटाईन सेंटरमध्ये हलविण्यात येईल.
ADVERTISEMENT