महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजारांपेक्षा जास्त Corona रूग्णांना डिस्चार्ज, 137 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

• 04:53 PM • 10 Aug 2021

महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 720 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 59 हजार 676 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.8 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 5 हजार 609 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 137 […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 720 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण 61 लाख 59 हजार 676 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 96.8 टक्के एवढं झालं आहे. आज राज्यात 5 हजार 609 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात 137 मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१ टक्के इतका झाला आहे.

हे वाचलं का?

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 99 लाख 5 हजार 96 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 63 हजार 442 नमुने पॉझिटिव्ह आहेत. सध्या राज्यात 4 लाख 13 हजार 437 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर राज्यात 2 हजार 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 66 हजार 123 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 5 हजार 609 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 63 हजार 442 इतकी झाली आहे.

मुंबईत 230 पॉझिटिव्ह रूग्ण

मुंबईत 230 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 403 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आत्तापर्यंत 7 लाख 15 हजार 792 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग 1712 दिवस इतका झाला आहे. ग्रोथ रेट ०.०४ टक्के झाला आहे. मुंबईत आज घडीला 3782 सक्रिय रूग्ण आहेत.

पुण्यात 226 नवे रूग्ण

पुण्यात दिवसभरात 226 नवे रूग्ण आढळले आहेत. तर 254 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत पुण्यात 4 लाख 78 हजार 373 रूग्ण कोरोतून बरे झाले आहेत. आज दिवसभरात पुण्यात 7 मृत्यू झाले आहेत.

मुंबई, ठाण्यासह पुण्यातही कोरोनाचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. तर मुंबईत 15 ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. ८ तारखेला मुख्यमंत्र्यांनी जो जनतेशी संवाद साधला त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. त्यासाठी उद्यापासून मुंबईतल्या उपनगरीय स्थानकांवर पडताळणी करून महिन्याभराचा प्रवासाचा पास दिला जाणार आहे.

    follow whatsapp