महाराष्ट्रात दिवसभरात 7 हजार 510 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 60 लाख 911 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 6 हजार 910 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात आज दिवसभरात 147 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.9 टक्के इतका झाला आहे. राज्यातला मृत्यूदर वाढला आहे. राज्यातला मृत्यूदर हा चिंतेचा विषय ठरतो आहे. कारण मृत्यूदर हा आधी 2 टक्के होता. त्यानंतर 2.1 टक्के झाला, त्यानंतर 2.4 टक्के इतका झाला. आता हे प्रमाण 2.9 टक्के इतकं झालं आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 58 लाख 46 हजार 165 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 29 हजार 596 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 60 हजार 354 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3 हजार 977 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 94 हजार 593 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात नोंद झालेल्या 6 हजार 910 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 62 लाख 29 हजार 596 इतकी झाली आहे.
आज राज्यातील कोव्हिड बाधित रुग्ण संख्येचे दिनांक 10 जुलै पर्यंतचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे तर कोविडमुळे झालेल्या मृत्यूंचे 12 जुलैपर्यंतचे रिकाँसिलिएशन करण्यात आले आहे. संबंधित जिल्ह्यांनी पूर्वीच्या कालावधीतील रुग्ण आणि मृत्यू या संदर्भातील माहिती अद्ययावत केल्याने आज राज्याच्या एकूण रुग्ण संख्येत 2479 ने वाढ झाली आहे तर राज्यातील एकूण मृत्यूसंख्या 3509 ने वाढली आहे. तथापि रुग्ण नोंदी अद्ययावत करण्यासोबतच दुहेरी नोंद वगळणे, रुग्णाच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेले बदल इत्यादी कारणांमुळे काही जिल्ह्यांच्या रुग्ण आणि मृत्यू संख्येत वाढ अथवा घट झाली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT