महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 950 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात देण्यात आला आहे. आत्तापर्यंत एकूण 59 लाख 74 हजार 594 कोरोना बाधित रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.28 टक्के इतके झाले आहे. आज राज्यात 8 हजार 172 नवीन रूग्णांचे निदान झाले आहे. तर राज्यात आज 124 रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2. 4 टक्के इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत राज्यात तपासण्यात आलेल्या 4 कोटी 52 लाख 60 हजार 468 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62 लाख 5 हजार 190 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 77 हजार 615 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 156 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 1 लाख 429 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 8 हजार 172 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 62 लाख 5 हजार 190 झाली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्णांची संख्या
मुंबई – 10 हजार 672
ठाणे – 15 हजार 793
पुणे- 16 हजार 339
कोल्हापूर- 10 हजार 48
सांगली- 9 हजार 872
नागपूर- 2 हजार 311
नाशिक- 1 हजार 880
अहमदनगर- 4 हजार 206
औरंगाबाद- 671
ADVERTISEMENT