महाराष्ट्रात आज दिवसभरात 8 हजार 429 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 61 लाख 3 हजार 325 कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.65 इतका झाला आहे. तर राज्यात 4 हजार 869 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. राज्यात दिवसभरात 90 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.1 टक्के इतका आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 83 लाख 52 हजार 467 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63 लाख 15 हजार 63 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 61 हजार 637 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 3 हजार 103 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 75 हजार 303 सक्रिय रूग्ण आहेत. आज महाराष्ट्रात 4 हजार 869 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 63 लाख 15 हजार 3 इतकी झाली आहे.
22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे या पार्श्वभूमीवर आधी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथील करण्यात येणार आहेत. मात्र महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल थ्रीचे नियम लागू असतील. तर बाकीच्या तीन जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करायचे की नाही याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे. हे 14 जिल्हे वगळता इतर 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्याचा निर्णय राज्य सरकारने ब्रेक द चेनच्या अंतर्गत घेतला आहे. नवे नियम मंगळवारपासून लागू होणार आहेत.
ज्या 11 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या पातळीचे निर्बंध लागू राहतील ते पुढीलप्रमाणे आहेत : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड, पालघर. या जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, सातारा, अहमदनगर येथे मोठ्या प्रमाणावर पॉझिटीव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती रुग्ण संख्या पाहता या जिल्ह्यांतील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन किती प्रमाणात कडक निर्बंध लावायचे त्याचा निर्णय घेतील. मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरवतील.
ADVERTISEMENT