१ मार्चपासून देशभरासह राज्यात कोरोनाच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांनीही कोरोनावरची लस घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही आज कोरोनाची लस घेतली आहे.
ADVERTISEMENT
कोश्यारी यांनी जे.जे. रुग्णालयात कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी वैद्यकीय व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने, अधिष्टाता डॉ. रणजित माणकेश्वर, डॉ. विजय सुरासे हजर होते.
नागपूर : रुग्णवाढीचा आलेख चढताच, १ हजाराहुन अधिकांना कोरोनाची लागण
दरम्यान, महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ८ हजार ९९८ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ६० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.३९ टक्के इतका आहे. तर आज राज्यात ६ हजार १९५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवर राज्यात एकूण २० लाख ४९ हजार ४८४ कोरोना रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
ADVERTISEMENT